एकनाथ खडसे यांचा राजीनामा हा दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला गेला नाहीतर पक्षात राहून त्यांनी चोऱ्या केल्या पार्टीत राहून जे पराक्रम केले आणि आर्थिक घोटाळे केले होते, त्यामुळं त्यांना पक्षाने हाकलून दिल्याचे वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. दाऊदच्या कारणामुळे पक्षातून काढले असावे असे एकनाथ खडसेंनी समजू नये, असे गिरीश महाजन म्हणाले.एकनाथ खडसेंनी सलीम कुत्ता प्रकरणामध्ये गिरीश महाजन यांच्यावर हल्ला चढवत राजीनाम्याची मागणी केली होती. यावर आता गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे.
एकनाथ खडसे ज्या फोटोवरुन आरोप करत आहेत ते दहा वर्षांपूर्वीचे कुंभमेळा प्रसंगी मुस्लिम धर्मगुरुंच्या घरी असलेल्या विवाह सोहळ्यातील फोटो असल्याचे महाजन म्हणाले.या सोहळ्यात अनेक आमदार खासदार उपस्थित होते.सध्या एकनाथ खडसे हे मानसिक तणावात असल्याचे महाजन म्हणाले.
हे ही वाचा:
विश्वातील कोणतीही शक्ती ३७० कलम परत आणू शकत नाही
गाडीखाली चिरडलेली तरुणी म्हणते, ‘मी प्रेमात होते, तो विवाहित असल्याचे माहीत नव्हते’
बिहारच्या दानापूर गावात पुजाऱ्याची अत्यंत निर्घृण हत्या!
भयानक!! दोन मुलांची आई असलेल्या विधवा महिलेची साडी मेट्रोत अडकली आणि…
ते पुढे म्हणाले की, भोसरी भूखंड प्रकरण गौण खनिज उत्खनन प्रकरणात आलेल्या नोटीसमुळं एकनाथ खडसेंची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. काय बोलावं हे आता एकनाथ खडसेंना कळत नाही. त्यामुळं वाटेल ते बेछूट आरोप ते करत आहेत. एकनाथ खडसे यांच्या आरोपाला आम्ही किंमत देत नसल्याचे महाजन म्हणाले. एकनाथ खडसे एकेकाळी आमच्यासोबत होते त्यामुळं ते आमचे सहकारी होते.
मात्र, आता त्यांची कीव करावी वाटत नसल्याचे महाजन म्हणाले. एकनाथ खडसेंमुळं त्यांच्या घरच्या लोकांनाही भोगावे लागले, असे मंत्री महाजन म्हणाले.त्यांचे जावई देखील अडीच वर्ष जेल मध्ये राहून आलेत.ते आता वैफल्यग्रस्त झाल्याने मला जास्त काही टीका-टिप्पणी करायची नसल्याचे महाजन म्हणाले.