27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषएकनाथांच्या मदतीला एकनाथ धावले!

एकनाथांच्या मदतीला एकनाथ धावले!

खडसेंना हार्टअटॅक, पाठवली एअर ऍम्ब्युलन्स

Google News Follow

Related

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.सध्या त्यांच्यावर जळगावमध्ये उपचार सुरू आहेत.एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क साधला होता.त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकनाथ खडसे यांच्या उपचारासाठी तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली आहे.एकनाथ खडसे यांच्या उपचारासाठी जळगावहून मुंबईला दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी शेतात फेरफटका मारत असतानाच त्यांना एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीबाबत माहिती समजली. एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याबाबत आदेश दिले. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यावर जळगावच्या गजानन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. आज संध्याकाळी ७.३० वाजता खडसेंना पुढील उपचारासाठी जळगावहून मुंबईसाठी उड्डाण करणार आहेत.

हे ही वाचा:

बेंगळुरूत महिला भूवैज्ञानिकाची चाकूने हत्या!

एक कोटीची लाच स्वीकारणाऱ्या अभियंत्याला रंगेहाथ पकडले!

गाझामध्ये युद्धबंदीसाठी अरब नेत्यांचा अमेरिकेवर दबाव!

विवादामुळे इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांचे आत्मकथन प्रकाशित होणार नाही!

जळगाव येथे एकनाथ खडसे यांच्यावर उपचार सुरु आहेत.खडसे यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर विवेक चौधरी यांनी सांगितले की, एकनाथ खडसे यांना दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. छातीत दुखणे आणि खोकला सुरू होता. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मधुमेह आणि इतर जुने आजार आहेत. सध्या त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. संध्याकाळी पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा