१३ डिसेंबर रोजी दोन तरुणांनी नवीन संसदेत शिरकाव करून घोषणाबाजी केली आणि नळ कांड्या फोडल्या.कालच्या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश निर्माण झाला.या प्रकरणी लोकसभा सचिवालयाने सुरक्षेतील त्रुटींबद्दल आठ सुरक्षा कर्मचार्यांना निलंबित केले आहे.
लोकसभेच्या अधिवेशनाचे कामकाज चालू असताना कल बुधवारी दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीमधून उड्या मारल्या.तरुणांनी घोषणा बाजी करत धुराच्या नळकांड्या फोडल्या. अचानक झालेल्या प्रकारामुळे लोकसभेतील खासदार भयभीत झाले.काही खासदारांनी एका तरुणाला पकडण्यासाठी पुढे सरसावले. तसेच संसदेच्या बाहेर देखील दोघांनी घोषणाबाजी करत नळकांड्या फोडल्या. यामध्ये एक महिला अन दुसरा महाराष्ट्रातील तरुण होता. संसदेत जेव्हा हा गदारोळ झाला तेव्हा सुरक्षा कर्मचारी तैनात होते. मात्र त्यांच्या देखत या तरुणांनी संसदेत शिरकाव केल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला.विशेष म्हणजे १३ डिसेंबर २००१ साली पाच दहशतवाद्यांनी संसदेत घुसुन हल्ला केला होता. या हल्ल्यात सुरक्षा जवानांसह नऊ जणांनी आपले प्राण गमावले होते.
हे ही वाचा:
संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचे पुनरावलोकन होणार
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरबाबत मोठा निर्णय
‘प्रेक्षक पाससाठी घुसखोर सातत्याने सेक्रेटरीच्या संपर्कात’
काश्मीर मध्ये धावणार वंदे भारत
संसदेत दोन तरुणांनी अधिवेशनात व्यत्यय आणल्यानंतर थोडा वेळ संसदेचे कामकाम बंद करण्यात आले होते.त्या नंतर पुन्हा कामकाज चालू केले.मात्र कालच्या प्रकारामुळे संसदेच्या सुरक्षेच्या त्रुटी दिसून आल्या. याबद्दल अनेक खासदारांनी नाराजी व्यक्त केली.सुरक्षेचा भंग केल्यानंतर पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जेव्हा सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आश्वासन दिले आणि हा धूर “सामान्य प्रकारचा” असल्याचे त्यांनी सांगितले.या घटनेची सखोल चौकशी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, गृह मंत्रालयाने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली असून तपासाचे नेतृत्व करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) प्रमुखाची नियुक्ती केली आहे.