दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये एका कार्यक्रमादरम्यान मंडप कोसळल्याची घटना घडल्याची माहिती समोर अली आहे. स्टेडियमच्या गेट क्रमांक दोनजवळ एक मोठा मंडप कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला होता. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. या घटनेत आठ जण जखमी झाल्याची माहिती आहे.
जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील मंडप कोसळण्याच्या घटनेतील जखमींना जवळच्या सफदरजंग हॉस्पिटल आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, दिल्लीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.
Delhi | More than 8 people injured after a temporary structure installed near Gate number 2 of Jawaharlal Nehru stadium collapses, say Police. Details awaited. pic.twitter.com/AeO7pLQq9I
— ANI (@ANI) February 17, 2024
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, “कामगार जेवण करण्यासाठी म्हणून गेलेले असताना ही घटना घडली. त्यामुळे कोणताही मोठा परिणाम किंवा मोठं नुकसान झालेलं नाही.”
हे ही वाचा:
युक्रेनचे अवदिवका शहर रशियाच्या ताब्यात
शंभू बॉर्डरवर तैनात असलेल्या सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
अश्विनचे कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स
भाजपला माझा प्रामाणिकपणा दिसला म्हणून तिकीट मिळाले!
अग्निशमन दल, दिल्ली पोलीस आणि घटनास्थळी उपस्थित लोकांकडून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. या घटनेत मंडपाखाली आणखी लोक दबले असण्याची शक्यता आहे. अधिक तपास सुरू आहे. दिल्लीचे व्हीआयपी खान मार्केटही याठिकाणाच्या जवळ आहे.