26 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरविशेषमध्य प्रदेशात मंदिरालगतची भिंत कोसळून नऊ मुलांचा मृत्यू

मध्य प्रदेशात मंदिरालगतची भिंत कोसळून नऊ मुलांचा मृत्यू

श्रावणमासानिमित्त शिवलिंग निर्माण आणि भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते

Google News Follow

Related

देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून दक्षिणेकडे केरळ आणि उत्तरेकडे हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड या राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आता मध्य प्रदेशमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. सागर जिल्ह्यातील शाहपूरमध्ये भिंत कोसळून नऊ मुलांचा मृत्यू झाला आहे. श्रावणमासानिमित्त शाहपूरच्या हरदोलमध्ये शिवलिंग निर्माण आणि भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी ही मुले जमलेली असताना ही दुर्घटना घडली.

श्रावणमासानिमित्त शाहपूरच्या हरदोलमध्ये शिवलिंग निर्माण आणि भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सकाळी शिवलिंग बनविण्याचे काम सुरु होते. शिवलिंग बनविण्यासाठी आठ ते १४ वर्षांची मुले या कार्यक्रमाला गेली होती. यावेळी शेजारील भिंत या मुलांवर कोसळली. ही भिंत ५० वर्षे जुनी होती, असे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

हरदौल मंदिरात शिवलिंग बांधणे व भागवत कथेचे आयोजन चालू होते. सुट्टीचा दिवस असल्याने आठ ते १४ वर्षे वयोगटातील अनेक मुलेही शिवलिंग बनवण्यासाठी पोहोचली होती. शिवलिंगाचे बांधकाम सुरू असताना अचानक मंदिर परिसरालगत असलेली ५० वर्षे जुनी मातीची भिंत कोसळल्याने हा भीषण अपघात झाला.

हे ही वाचा..

पुणे जिल्ह्यातील प्रशासनाने सतर्क राहावे

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय देखील पूर्ण भरले

मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर अंकुश लावणार? संसदेत आणणार महत्त्वाचे विधेयक

योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोजर कारवाईचे मायावतींकडून कौतुक

या घटनेनंतर घटनास्थळी खळबळ उडाली असून तातडीने भिंतीचा ढिगारा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. नगर परिषद, पोलीस आणि रहिवासी मदतकार्यात गुंतले आहते. गेल्या २४ तासांमध्ये सागरमध्ये १०४ मिमी पावसाची नोंद झाली असून, त्यामुळे कच्च्या आणि जीर्ण बांधकामांवर परिणाम झाला आहे आणि ही भिंत कोसळण्याचा धोका वाढला आहे. दरम्यान, अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात आणण्यात आले मात्र, तेथे एकही डॉक्टर आढळला नाही त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला. अनेकदा डॉक्टर येतात आणि फक्त सही करून निघून जातात, असा आरोप लोकांनी केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा