आयफेल टॉवर ‘संपावर’

कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

आयफेल टॉवर ‘संपावर’

व्यवस्थापनाच्या गैरनियोजनामुळे संतप्त झालेले कर्मचारी बुधवारी संपावर गेल्याने पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेले आयफेल टॉवर बुधवारी बंद करण्याची नामुष्की व्यवस्थापनावर आली.

आयफेल टॉवरचे बांधकाम करणारे इंजिनीअर गुस्तेव्ह आयफेल यांच्या १००व्या पुण्यतिथीनिमित्त कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारल्याचे जनरल जनरल कॉन्फडरेशन ऑफ लेबर (सीजीटी) युनियनतर्फे सांगण्यात आले.

टॉवरचे कामकाज पाहणाऱ्या कंपनीमध्ये गैरनियोजनाचा कळस झाला आहे, असा आरोप युनियनने केला आहे. आयफेल टॉवरचे व्यवस्थापन बघणाऱ्या कंपनीने समोर आणलेले बिझनेस मॉडेल हे खूपच महत्त्वाकांक्षी आणि अशाश्वत असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच, भविष्यातील पर्यटकांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन कंपनीने बांधकामाच्या खर्चाला कमी लेखले आहे, असा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यानंतर व्यवस्थापन कंपनीने पर्यटकांची माफीही मागितली.

हे ही वाचा:

चॅट जीपीटीला रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे ‘भारत जीपीटी’ देणार टक्कर

अयोध्या; चौरासी (८४) कोसी परिक्रमा परिसरात ‘दारू बंदी’!

डीएमडीके प्रमुख आणि अभिनेते विजयकांत यांचे कोरोनाने निधन!

रामलल्लाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर ४० सूर्यस्तंभ झगमगणार!

तसेच, ज्यांनी बुधवारसाठी ई-तिकिटे घेणाऱ्यांना पुढील बुकिंसगाठी त्यांचे ईमेल पाहण्याची सूचना केली.
आयफेल टॉवरला दरवर्षी सुमारे ७० लाख पर्यटक भेट देतात. त्यातील पाऊण संख्या परदेशी पर्यटकांची असते. टॉवरचे व्यवस्थापन ७४ लाख वार्षिक पर्यटकांवर अभ्यागतांवर भविष्यातील अर्थनियोजन आधारित आहे, मात्र ही पातळी कधीही गाठली गेली नाही, असे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे. करोनासाथीमुळे बंद करावे लागलेले पर्यटनस्थळ आणि प्रवास निर्बंधांमुळे पर्यटकांच्या संख्येत झपाट्याने घट झाली, परंतु २०२२मध्ये पुन्हा पर्यटकसंख्येत वाढ झाली होती. या वर्षी ५९ लाख पर्यटकांनी आयफेल टॉवरला भेट दिली होती.

Exit mobile version