जम्मू-काश्मीरचे सांगिओटे गाव ईद साजरी करणार नाही!

जम्मू काश्मीरमधील लष्कराच्या ट्रकवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद

जम्मू-काश्मीरचे सांगिओटे गाव ईद साजरी करणार नाही!

आज संपूर्ण देश ईदचा सण साजरा करतोय. त्याला अपवाद आहे जम्मू-काश्मीरमधील सांगिओटे गाव. जम्मू काश्मीरमधील लष्कराच्या ट्रकवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. वास्तविक गुरुवारी हल्ला झालेला लष्कराचा ट्रक याच सांगिओटे गावात इफ्तार पार्टीसाठी फळे आणि इतर वस्तू येत होता. यामुळे पुंछमधील सांगिओटे गावाने आज ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुंछ-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर भाटादूड़ियां आणि तोता गल्ली दरम्यान भिंबर गल्लीजवळ हा ट्रक होता. त्यावेळी दाट धुके आणि पावसात दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात पाच जवान शहीद झाले होते. यात एक जवान जखमी झाला.

हेही वाचा :

यवतमाळचा १५ वर्षीय पर्यावरण संरक्षक;बोधिसत्व खंडेरावचा जगात बोलबाला !

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केरळ दौऱ्याच्या आधी आत्मघातकी हल्ल्याची धमकी

काँग्रेसने ७० वर्षात एकाच देशात दोन देश निर्माण करण्याचे काम केले

चिनी सैनिकांच्या कृत्यांना भारतीय जवान देणार त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर

रायफल्स युनिटने इफ्तार पार्टीसाठी खास व्यवस्था केली होती. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी सात वाजता सांगिओटे गावात होणार होता. त्यात चार हजारांहून अधिक लोक सहभागी होणार होते. सांगियोटे पंचायतीचे सरपंच मुख्तियाज खान म्हणाले, ‘मलाही इफ्तारला जायचे होते. आमचे पाच जवान शहीद झाले असताना आम्ही इफ्तार कसा करू शकतो. ही बातमी कळताच गावात निराशेचे वातावरण पसरले. आम्हालाही तिथे जायचं होतं, पण पोलिस आणि लष्कराने परिसराला वेढा घातला होता. ते म्हणाले की, ग्रामस्थ शनिवारी ईद साजरी करणार नाहीत. आम्ही फक्त प्रार्थना करू.

आतापर्यंत १२ जणांना घेतले ताब्यात
दरम्यान, भाटादूड़ियां परिसरातील घनदाट जंगलात सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलीस मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवत आहेत. ड्रोन आणि स्निफर डॉग, हेलिकॉप्टर दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. आतापर्यंत १२ जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

दहशतवाद्यांनी बॉम्बचा वापर केला, ३६ राऊंड गोळ्या झाडल्या
आयबीच्या अहवालाचा हवाला देत प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दहशतवाद्यांनी या हल्ल्यासाठी बॉम्बचा वापर केला होता. कटरा हल्ल्याच्या धर्तीवर त्यांनी हा हल्ला केला आहे. आयबीने गृह मंत्रालय आणि एनआयएला सांगितले की, ट्रकवर सुमारे ३६ राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या. स्टीलच्या गोळ्यांचाही वापर करण्यात आला.

Exit mobile version