कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विमान प्रवासावरही निर्बंध लादण्यात आले होते. कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना टाळेबंदीच्या काळातील नुकसान भरून काढण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यावर व्यवस्थापनाचे लक्ष आहे. मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन आता अदानी समुहाकडे आहे. नवनवीन उपाययोजनांमध्ये देशांतर्गत प्रवासी वाढवण्याकडे व्यवस्थापनाचे लक्ष असणार आहे.
प्रवासी संख्या वाढवण्यासाठी काही देशांतर्गत मार्गावरील सेवा पुन्हा सुरू होणार आहे. द्वितीय श्रेणीतील प्रवासी आकर्षित करण्याचे व्यवस्थापनाचे लक्ष्य आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला तरी विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली नाही. प्रवासी संख्या पूर्वपदावर येत असल्यामुळे आर्थिक स्थितीतही फार मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली नाही. प्रवाशांना घराबाहेर पडण्यासाठी प्रोत्साहित करावे लागणार आहे हे ओळखून व्यवस्थापनाने त्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
विमानतळ व्यवस्थापनाने पहिल्या टप्प्यातील द्वितीय श्रेणीतील पाच शहरांतील सेवा पुन्हा सुरू केली आहे. या सेवांमध्ये बरेली, विशाखापट्टणम, तिरुपती, अजमेर आणि पोरबंदर यांचा समावेश आहे. जुलै महिन्याच्या अहवालानुसार मुंबईहून हैद्राबादला प्रवास करणाऱ्यांची संख्या एकूण प्रवाशांपैकी ७ टक्के होते. तसेच गोवा आणि अहमदाबाद येथे प्रवास करणाऱ्यांची संख्या ५ टक्के होती. या काळात इंडिगोने ३ लाख ५० हजार प्रवाशांना सेवा दिली.
हे ही वाचा:
केवळ दोन डोस घेतलेल्यांनीच मॉलमध्ये जा…..वाचा सविस्तर!!
सावधान ! डासांचे आक्रमण सुरू झाले आहे
‘मुख्यमंत्र्यांच्या घोषणेआधीच उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय; ही तर श्रेयाची लढाई’
एअर इंडियाने ८० हजार आणि गो एअरने ४६ हजार प्रवाशांना सेवा दिली अशी माहिती विमानतळ व्यवस्थापनाने दिली आहे. तसेच प्रवाशांचा प्रतिसाद पाहून मार्ग आणि फेऱ्यांमध्ये वाढ केली जाईल अशी माहिती विमानतळ व्यवस्थापनाने दिली आहे. भविष्यात प्रवासी संख्येत वाढ होऊन त्याचा फायदा नकीच विमानतळ व्यवस्थापनेला होईल.