27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषदावोस आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचे प्रभावी ब्रॅण्डिंग व्हावे

दावोस आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचे प्रभावी ब्रॅण्डिंग व्हावे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Google News Follow

Related

दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) महाराष्ट्रासाठी मोठ्या गुंतवणूक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या जगभरातील उद्योगांशी उत्तम संपर्कसमन्वय राखा. परिषदेत मॅग्नेटिक महाराष्ट्राचे‘ प्रभावी ब्रॅण्डिंग कराअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे १५ ते १९ जानेवारी या कालावधीत ही जागतिक परिषद होणार आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालीलउद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह दहा प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सादरीकरण केले.

हेही वाचा..

“मुल्लांच्या दाढ्या कुरवाळण्यासाठी जितेंद्र आव्हाड कुठल्या थराला गेलेत पहा”

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कीगतवर्षी आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. १ लाख ३७ हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले होते. त्यापैकी ७६ टक्के करार प्रत्यक्षात आले आहेत.ते आता कार्यवाहीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेतही समाधानाची बाब आहे. यंदाही दावोसमध्ये आपल्याला महाराष्ट्राचे प्रभावी ब्रॅण्डिंग करण्याची संधी आहे. पोलादमाहिती तंत्रज्ञानया माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत उद्योगऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत – ग्रीन हायड्रोजन या क्षेत्रातील उद्योग येतील. त्याचबरोबर कृषि- औद्योगिककृषि आणि वनोपज यांचे मूल्यवर्धन करणारे उद्योग यावेतयासाठी प्रयत्न करण्यात यावेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. महाराष्ट्रात उद्योगांसाठीची इकोसिस्टिम‘ अत्यंत उत्तम आहेहे उद्योग जगतालाही माहीत आहे. त्यामुळे या परिषदेच्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेता येईलअसा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले कीया गुंतवणूक परिषदेत जगभरातील आणि विविध क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांचा प्रतिसाद मिळेल यासाठी समन्वय साधण्यात येत आहे. या परिषदेत गुंतवणूक करार आणि वाटाघाटी यासाठी विशेष संधी आहेत. त्यांचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. या परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांना राऊंड टेबल‘ चर्चेत विचार मांडण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. परिषदेत विविध राष्ट्रप्रमुखपंतप्रधानउद्योग व व्यापार विषयक मंत्रीअन्य देशांची शिष्टमंडळ तसेच जगातील विविध क्षेत्रातील दिग्गज कंपन्याचे प्रमुखगुंतवणूकदारउद्योग क्षेत्रातील तज्ज्ञमाध्यम समूहाचे प्रमुख आदींशी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासहउद्योग मंत्री सामंत आणि प्रतिनिधी मंडळातील सदस्य संवाद साधणार आहेत. त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.

           

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा