महाकुंभाचा परिणाम! अयोध्येत भाविकांची प्रचंड गर्दी, ट्रस्टने केले आवाहन!

अयोध्या प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था कडक 

महाकुंभाचा परिणाम! अयोध्येत भाविकांची प्रचंड गर्दी, ट्रस्टने केले आवाहन!

रामनगरी अयोध्या आजकाल भाविकांच्या प्रचंड गर्दीने भरलेली आहे. प्रयागराजमध्ये सुरू असलेला महाकुंभ आणि २९ जानेवारीला मौनी अमावस्येच्या मुख्य स्नानामुळे लाखो भाविक अयोध्येत पोहोचत आहेत. गेल्या तीन दिवसांत रामलला आणि हनुमानगढी मंदिरात दर्शनासाठी जमलेल्या गर्दीमुळे व्यवस्थेवर ताण वाढला आहे.

प्रजासत्ताक दिनी अयोध्येतील रामलला आणि हनुमानगढी मंदिरांना २५ लाखांहून अधिक भाविकांनी भेट दिली. जन्मभूमी मार्ग, भक्तीपथ आणि धर्मपथावर मोठी गर्दी दिसून येत आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी १० कोटींहून अधिक भाविक प्रयागराजमध्ये स्नान करतील अशी अपेक्षा आहे, त्यानंतर मोठ्या संख्येने लोक अयोध्येकडे जात आहेत.या अभूतपूर्व गर्दीच्या पार्श्वभूमीवर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सोशल मिडीयावरून भाविकांना विशेष आवाहन केले आहे. दूरवरून येणाऱ्या भाविकांना कोणत्याही त्रासाशिवाय रामललाचे दर्शन घेता यावे यासाठी स्थानिक भाविकांनी १५-२० दिवसांनी दर्शनासाठी यावे, असे ट्रस्टने म्हटले आहे. गर्दी कमी आणि हवामान अनुकूल असेल तेव्हा वसंत पंचमीनंतर फेब्रुवारीमध्ये अयोध्येला जाण्याचा सल्ला ट्रस्टने दिला आहे. दरम्यान, ट्रस्टकडून आवाहन करण्यात आल्यानंतर अयोध्येतील भाविकांच्या गर्दीचा आपण अंदाज लावू शकतो.

हे ही वाचा : 

‘छावा’ चित्रपटातील ‘ते’ दृश्य हटणार, पण भाजपाच्या जिल्हाध्यक्षांची आणखी एक मागणी!

विद्यार्थिनीवर अत्याचार करून हत्या करण्यासाठी विद्यार्थ्याला १०० रुपयांची सुपारी!

एनआयएने तामिळनाडूमध्ये १६ ठिकाणी छापे

राणा अय्युब विरुद्ध एफआयआर दाखल

दरम्यान, प्रचंड गर्दी पाहता अयोध्या प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. रामलला आणि हनुमानगढी मंदिरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासह साध्या वेशातील पोलिसही तैनात करण्यात आले आहेत.

https://youtu.be/4JmD7bdaWlw?si=t5KuiEcZ_xIe2xZW

Exit mobile version