24 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषनिपाह व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोझिकोडमधील शैक्षणिक संस्था बंद

निपाह व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोझिकोडमधील शैक्षणिक संस्था बंद

रविवार, २४ सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद

Google News Follow

Related

केरळमध्ये सध्या निपाह व्हायरसचा धोका अधिक वाढत असून राज्यामध्ये निपाह व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोझिकोडमधील सर्व शैक्षणिक संस्था आठवडाभर बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये शाळा, व्यावसायिक महाविद्यालये आणि शिकवणी केंद्रांचा समावेश आहे.

यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना २४ सप्टेंबरपर्यंत कोझिकोडमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी जमणे टाळण्याचे आदेश जारी करण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यानंतर पुढील रविवार, २४ सप्टेंबरपर्यंत शाळा, व्यावसायिक महाविद्यालये आणि शिकवणी केंद्र बंद असणार आहेत. दरम्यान, संपूर्ण आठवडाभर ऑनलाइन वर्ग उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी दिली.

आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी शुक्रवारी सांगितले की, सध्या निपाह विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींच्या थेट संपर्कात आलेल्या लोकांच्या यादीत १ हजार ८० लोक आहेत. इतर जिल्ह्यातील एकूण २९ लोक निपाह व्हायरसची लागण झालेल्या लोकांच्या संपर्क आलेले आहेत. वीणा जॉर्ज म्हणाल्या, त्यापैकी 22 मलप्पुरममधील, एक वायनाडमधील आणि प्रत्येकी तीन कन्नूर आणि त्रिशूर येथील आहेत. यापैकी १७५ सामान्य लोक आणि १२२ आरोग्य कर्मचारी आहेत.

हे ही वाचा:

गणेशोत्सवासाठी दादर गजबजले

आदित्य एल-१ने चौथ्यांदा यशस्वीपणे बदलली कक्षा

सन २०२३मध्ये ९६ टक्के प्रकरणे निकाली निघाली; सर्वोच्च न्यायालयाने दिली माहिती

चंद्रावर पाणी असल्याला पृथ्वीचे वातावरण जबाबदार

बाधित आढळलेल्या परिसरात केवळ जीवनावश्यक वस्तू आणि वैद्यकीय साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांनाच काम करण्याची परवानगी असणार आहे. अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यामुळे मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

कोझिकोड जिल्ह्यात निपाह विषाणूच्या संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी लोकांना घाबरू नये आणि त्याऐवजी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले होते. प्रत्येकाने आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि निर्बंधांना पूर्ण सहकार्य करावे, असे ते म्हणाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा