महाराष्ट्रात विविध ठिकाणी वाढलेला कडक उन्हाळा आणि उष्माघाताची स्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. अलीकडेलच राज्य शासनाने प्राथमिक स्तरावर उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांच्या हितार्थ काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. आता शाळांबाबतही मोठा निर्णय घेतांना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या असतील आजच शाळांना सुट्ट्या जाहीर करा असे म्हटले आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती शासनातर्फे जारी केल्या जाणाऱ्या एका परिपत्रकातून देण्यात येईल असेही केसरकर यांनी म्हटले आहे.
एकिकडे अवकाळी पावसाने कहर केला असतानाच दुसरीकडे राज्यात उष्णतेची लाट वाढत आहे. बहुतांश शहरात चाळीच्या आसपास तर काही ठिकाणी चाळीशी वर तापमान गेले आहे. दुपारच्यावेळी बाहेर पडणे लोकांना अवघड होत आहे. उन्हाच्या चटक्यांनी जीवाची काहिली होत असल्याचे बघायला उलट आहे. राज्यातील सध्याचे कडाक उन्हाचे वातावरण विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकते . हे लक्षात घेऊनच शिक्षणमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
अदानीविरोधकांना हादरा, गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट
महाराष्ट्र का म्हणतोय, बरे झाले ठाकरे गेले???
राहुल गांधी यांना धक्का, मानहानीबद्दल झालेली शिक्षा कायम
आर्थिक मदतीसाठी येमेनमध्ये झाली तुफान चेंगराचेंगरी; ८० पेक्षा जास्त लोक ठार
उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान विद्यार्थ्यांना अभ्यास देऊ नये असे सांगतानाच केसरकर यांनी राज्यातील शाळा १३ऐवजी १५ जून रोजी सुरु होणार असल्याचे सांगितले. विदर्भात मात्र ३० जूनला शाळा सुरु होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांमुळे यावर्षी जास्त दिवसांच्या उन्हाळी सुट्टीचा आनंद घेता येणार आहे.
राज्यातून अवकाळीचा प्रभाव कमी होत असतानाच एप्रिल महिन्याच्या अखेरपासून उन्हाचा तडाखा दिवसागणिक वाढतच चालला आहे. अशा परिस्थितीत यंदा शाळांना मे महिन्याची सुट्टी एप्रिलपासून देण्यात येत असल्याचे केसरकर यांनी सांगितले . शाळांतील परीक्षांचा अहवाल मागवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.