दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना बुधवारी कथित अवैध दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आणखी एक समन्स जारी केले. हे त्यांना देण्यात आलेले सहावे समन्स आहे.
निवडणुकीत प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी समन्स बजावण्यात आल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे.कथित बेकायदेशीर दारू घोटाळा प्रकरणात समन्स बजावल्यानंतर ईडीने ३ फेब्रुवारी रोजी राऊस अव्हेन्यू न्यायालयात केजरीवाल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट दिव्या मल्होत्रा यांनी सांगितले होते की, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम ५० अंतर्गत तपास यंत्रणांना तपासादरम्यान कोणत्याही व्यक्तीला बोलावण्याचा अधिकार आहे ज्याची उपस्थिती पुरावा देण्यासाठी किंवा रेकॉर्ड सादर करण्यासाठी आवश्यक मानली जाऊ शकते. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांना कायद्याच्या कलाम ५० (३) नुसार अशा समन्सचे पालन करण्यास ते बांधील आहेत, असे न्यायालयाने म्हटले होते.