32 C
Mumbai
Friday, October 18, 2024
घरविशेषईडीची नामांकित ज्वेलर्सवर जप्ती, ३१५ कोटींच्या मालमत्तांवर टाच!

ईडीची नामांकित ज्वेलर्सवर जप्ती, ३१५ कोटींच्या मालमत्तांवर टाच!

मुंबई,जळगाव,ठाणे,सिल्लोड,कच्छ भागात ईडीकडून कारवाई

Google News Follow

Related

राज्यात ईडीच्या कारवाईचे सत्र सुरूच आहे.महाराष्ट्रातील मुंबई,जळगाव,ठाणे,सिल्लोड,कच्छ भागात ईडीकडून कारवाई करण्यात आली.या कारवाईत ७० मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून मालमत्तांची किंमत अंदाजे ३१५ कोटी आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर बँक फसवणूक प्रकरणात ही जप्ती करण्यात आली आहे.

ईडीने जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील ७० स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केल्या आहेत. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी पीएमएलए, २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे.

हे ही वाचा:

बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे ५० ठिकाणी छापे

इतिहास घडणार; छत्तीसगडमध्ये ‘बुलेट’वर ‘बॅलेट’चे यश

संगीत महोत्सवातील हमासच्या नृशंस हल्ल्याची हादरवणारी दृश्ये उघड!

स्वतःच्याच बंदुकीची गोळी लागून अग्निवीराचा मृत्यू!

राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आरएल गोल्ड व मनराज ज्वेलर्स आणि त्यांचे प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन लालवानी, मनीष ईश्वरलाल जैन लालवानी यांच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे.यामध्ये यांच्यासह इतरांनी मिळवलेल्या बेनामी मालमत्तांचा समावेश आहे.

ईडीने जळगाव, नाशिक आणि ठाणे (महाराष्ट्र) येथील राजमल लखीचंद समूहाच्या १३ ठिकाणी छापे टाकले. या छापेमारीत गुन्हेगारी कागदपत्रांसह सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने/सराफा आणि भारतीय चलन जप्त करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
183,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा