अरविंद केजरीवालांच्या पीएसह आप नेत्यांच्या घरावर ईडीचे छापे!

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई

अरविंद केजरीवालांच्या पीएसह आप नेत्यांच्या घरावर ईडीचे छापे!

अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा एक भाग म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव आणि आम आदमी पार्टीशी संबंधित लोकांच्या जागेवर छापे टाकले आहेत.सकाळपासून त्यांच्या नेत्यांच्या घरांवर ईडीचे छापे सुरू असल्याचा दावा खुद्द आम आदमी पक्षानेच केला आहे.

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार एनडी गुप्ता यांच्या घरावरही ईडीने छापा टाकल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे.विशेष म्हणजे दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी यांनी ईडीबाबत मोठा खुलासा करणार असल्याचे सांगितले होते.आज आज मंगळवारी सकाळी १० वाजता ही पत्रकार परिषद होणार होती तत्पूर्वी ईडीची कारवाई पाहायला मिळाली.

हे ही वाचा:

औरंगजेबाने तोडले होते कृष्णजन्मभूमी मंदिर!

अमेरिकेत भारतीय स्थलांतरितांसाठी ग्रीन कार्डचा मार्ग खुला होणार

मुस्लिम धर्मगुरु अटक प्रकरणी शंभरपेक्षा जास्त जणांविरुद्ध गुन्हा

मुलुंडमध्ये भरदिवसा रस्त्यात डिलिव्हरी बॉयची हत्या

‘न्युज १८’च्या बातमीनुसार, ईडीची पथक १० हून अधिक ठिकाणी शोध मोहीम राबवत आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांचे स्वीय सचिव बिभव कुमार यांच्या घरावरही छापे टाकण्यात येत आहेत. याशिवाय जल बोर्डाचे माजी सदस्य शलभ कुमार यांच्या घरावरही शोधमोहीम सुरू आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीतील आम आदमी पार्टी आणि त्याच्याशी संबंधित नेत्यांच्या घरांवर ईडीची कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Exit mobile version