26 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरविशेषकाँग्रेसच्या भूपेंद्र सिंह हुड्डांवर ईडीची कारवाई, ८३४ कोटींची मालमत्ता जप्त!

काँग्रेसच्या भूपेंद्र सिंह हुड्डांवर ईडीची कारवाई, ८३४ कोटींची मालमत्ता जप्त!

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई

Google News Follow

Related

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने हुड्डा,  इमार (EMAAR) आणि एमजीएफ (MGF) डेव्हलपमेंट लिमिटेडसह इतर आरोपींविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ८३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ही मालमत्ता गुरुग्राम आणि दिल्लीतील २० गावांमध्ये आहे. इमार-एमजीएफ कंपन्यांनी हुड्डा आणि डायरेक्टर डीटीसीपी त्रिलोक चंद गुप्ता यांच्याशी हातमिळवणी करून स्वस्त दरात जमीन हडप केली, असा त्यांच्यावर आरोप आहे. यामध्ये दोन कंपन्यासह हुड्डा यांना फायदा झाला होता तर जनतेसह त्यावेळी सरकारला देखील तोटा झाल्याची माहिती आहे.

ईडीने कारवाई करत इमार इंडिया लिमिटेडची (EMAAR) ५०१.१३ कोटी रुपये किमतीची आणि एमजीएफ डेवलपमेंट्स लिमिटेडची ३३२.६९  कोटी किमतीची ४०१.६५४७९ एकर जमीन स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडी तपास करत आहे.

हे ही वाचा :

दहा वर्षांत फिनटेक क्षेत्रात ३१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; स्टार्टअपमध्ये ५०० टक्क्यांची वाढ

विष पेरणाऱ्या २४ मशिदींवर ब्रिटनची नजर, दोषी आढळल्यास मौलवीला १४ वर्षांची शिक्षा !

‘शिवलिंगावरील विंचू’ वक्तव्यामुळे पंतप्रधानांची बदनामी; थरूर यांना न्यायालयाने फटकारले

मुंबईतून सोने तस्करांना अटक, १७ कोटी किमतीचे २३ किलो सोने जप्त !

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा, तत्कालीन संचालक, डीटीसीपी, त्रिलोक चंद गुप्ता, एमार एमजीएफ लँड लिमिटेड आणि इतर १४ वसाहती कंपन्यांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे. हे प्रकरण विविध जमीन मालक, सामान्य जनता आणि हुड्डा यांच्याशी झालेल्या फसवणुकीशी संबंधित आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर हुड्डा यांच्यावर होत असलेली कारवाई कॉंग्रेसला भारी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा