पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे, ३ कोटी रुपये जप्त!

ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे, ३ कोटी रुपये जप्त!

ईडीच्या पथकाने बुधवारी (२९ मे) बेकायदेशीर खाणकाम आणि जगदीश सिंह उर्फ भोला ड्रग्स प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई केली आहे.ईडीच्या पथकाने पंजाबमधील रूपनगर जिल्ह्यात एकूण १३ ठिकाणी छापे टाकले आहेत.या कारवाईत आतापर्यंत पथकाने तीन कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

एबीपी हिंदीच्या बातमीनुसार, जगदीश सिंग उर्फ ​​भोला ड्रग्स प्रकरणात ईडीच्या पथकाने जप्त केलेल्या जमिनीवर बेकायदेशीर खाणकाम केले जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.त्यानंतर पथकाने ही कारवाई केली. अवैध खाण प्रकरणातील काही आरोपींमध्ये नसीब चंद आणि श्री राम क्रशर यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानला पुन्हा इंडी आघाडीचा पुळका; म्हणे पंतप्रधान मोदींचा पराभव व्हावा ही प्रत्येक पाकिस्तानीची इच्छा!

‘व्होट जिहाद’साठी तृणमूलने ओबीसींची केली फसवणूक

१९६२ चे चिनी आक्रमण म्हणे ‘कथित’; मणिशंकर यांच्याकडून माफी

हिंदुत्व, ईश्वर समर्थक, माफियाविरोधी प्रतिमेमुळे योगी यांचे स्थान बळकट

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, झडतीदरम्यान आतापर्यंत सुमारे ३ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. हे ड्रग्स मनी लाँड्रिंग प्रकरण कोट्यावधी रुपयांच्या सिंथेटिक अंमली पदार्थांच्या रॅकेटशी संबंधित आहे, जे २०१३-१४ दरम्यान पंजाबमध्ये उघडकीस आले होते. या प्रकरणी ईडीने पंजाब पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे गुन्हा दाखल केला होता, जो सामान्यतः भोला ड्रग्ज केस म्हणून ओळखला जातो.

काय प्रकरण आहे?
पंजाबमधील ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगचे हे प्रकरण २०१३-१४ दरम्यान पोलिसांनी उघडकीस आणले होते. यानंतर पंजाब पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे ईडीने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील तपासादरम्यान जगदीश सिंग उर्फ ​​भोला याचा सहभाग समोर आला. केंद्रीय तपास यंत्रणेने जानेवारी २०१४ मध्ये भोलाला अटक केली होती.

Exit mobile version