लालू प्रसाद यांच्या नातेवाईकाकडून २५ कोटींची मालमत्ता जप्त!

मनी लाँड्रिंग प्रकरणी कारवाई

लालू प्रसाद यांच्या नातेवाईकाकडून २५ कोटींची मालमत्ता जप्त!

राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय माजी आमदार अरुण यादव यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अरुण यादव यांची सुमारे २५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये या प्रकरणी ईडीने अरुण यादव यांच्या घरावर छापा टाकला होता. फेब्रुवारीमध्ये ईडीचे सर्च ऑपरेशन झाले होते.

ईडीने बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोपांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा एक भाग म्हणून फेब्रुवारी २०२४ मध्ये आरजेडी माजी आमदार अरुण यादव, त्यांची पत्नी किरण देवी आणि काही इतरांच्या घरावर छापे टाकले होते. यानंतर ईडीने माजी आमदार आणि त्यांच्या पत्नी विरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केला होता.

हे ही वाचा : 

जम्मू- काश्मीरच्या अनंतनागमधून दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण

घटना घडून पाच दिवस झाल्यानंतर बोपदेव घाट परिसर पाहणीचा देखावा कशासाठी?

आरबीआयकडून दिलासा; सलग दहाव्यांदा रेपो रेट जैसे थे स्थितीत

स्त्री शक्तीचा जागर: झाशीची राणी लक्ष्मीबाई

या तपासाअंतर्गत ईडीने यापूर्वी अरुण यादव आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचे जबाब नोंदवले होते. तसेच, ईडीने त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि किरण दुर्गा कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडची मालमत्ता, कागदपत्रे आणि बँक खात्यांचा तपशील घेतला होता. याआधी केंद्रीय तपास यंत्रणेच्या वेगवेगळ्या पथकांनी गेल्या वर्षी मे महिन्यात आणि या वर्षी जानेवारीमध्ये भोजपूरच्या अगियांव गावातील घर आणि दानापूर येथील फ्लॅटची झडती घेतली होती.

Exit mobile version