जगातील एकमेव संस्कृत दैनिकाचे संपादक के.व्ही.संपत कुमार यांचे निधन

जगातील एकमेव संस्कृत दैनिकाचे संपादक के.व्ही.संपत कुमार यांचे निधन

जगातील एकमेव संस्कृत वर्तमानपत्र असलेल्या ‘सुधारणा’ चे संपादक के.व्ही.संपत कुमार यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवार, ३० जून रोजी दुपारी मैसूर येथे त्यांचे निधन झाले. कार्डियाक अरेस्ट अर्थात हृदयाचे कार्य थांबणे त्यांच्या निधनाला कारणीभूत ठरले.

गेली अनेक वर्ष संपत कुमार हे ‘सुधारणा’ या जगातील एकमेव संस्कृत दैनिकाचे संपादक म्हणून काम पाहात होते. त्यांना हा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता. त्यांचे वडील पंडित के.एन.वरदराज यांनी १९७० साली ‘सुधारणा’ हे संस्कृत दैनिक सुरु केले. संपत कुमार यांनी ‘सुधारणा’ चे प्रतिनिधी, प्रूफ रिडर, संपादक, प्रकाशक, अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.

हे ही वाचा:

अजित दादांच्या सीबीआय चौकशीसाठी चंद्रकांत दादांचे पत्र

भारतात ‘सबका साथ’वर शिक्कामोर्तब

महिना १०० कोटी खंडणी गोळा करण्याआधी केंद्राला विचारले होते काय?

शालेय पाठ्यपुस्तकात होणार ‘ऐतिहासिक’ सुधारणा

जगभरातील संस्कृत अभ्यासकांपर्यंत ‘सुधारणा’ दैनिक पोहोचावे या दृष्टीने संपत कुमार यांनी ई-आवृत्तीही सुरु केली. त्यांच्या या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्या ‘सुधारणा’ वर्तमानपत्राचे अंदाजे ४००० वाचक आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत २०२० साली भारत सरकारतर्फे संपत कुमार आणि त्यांच्या पत्नी विदुषी के.एस.जयालक्ष्मी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

के.व्ही.संपत कुमार यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत संपत कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. संस्कृतच्या संवर्धन आणि प्रचारासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version