केंद्र सरकारने इंधनाच्या किंमती कमी केल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला असताना आता सामान्य नागरिकांसाठी अजून एक सुखद धक्का देणारे वृत्त समोर आले आहे. देशांतर्गत बाजारात मोहरी, शेंगदाणे, सोयाबीन, पामोलिनसह सर्व खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये घट होताना दिसत आहे. या खाद्यतेलाच्या दरात प्रतिलिटर ७ ते १० रुपयांनी घसरण झाली आहे.
सध्या स्थानिक पातळीवरील खाद्यतेलाची मागणी सोयाबीन, भुईमूग, सरकी आणि मोहरीच्या तेलाने भागवली जात आहे. मात्र, इंडोनेशियाने २३ मे पासून भारताला होणाऱ्या पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी हटवल्याने सोयाबीन आणि पाम तेलाच्या किमती जवळपास १०० डॉलरने खाली आल्या आहेत. यामुळे आयातही सुरू झाली असून येत्या काही दिवसांत इंडोनेशियातून तेलाची आवक सुरळीत झाल्यानंतर खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील त्या चार आरोपींना सीबीआयने घेतलं ताब्यात
इंग्लंडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपुढे सोनिया गांधीनी पसरला पदर
जपानी मुलाचं हिंदी ऐकून पंतप्रधान मोदी म्हणाले…
खाद्यतेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. नुकतीच सरकारने पेट्रोल, डीझेलच्या दरात कपात केली. त्यामुळे महागाईमुळे बजेट बिघडलेल्या जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.