अंमलबजावणी संचालयानाची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील कारवाई गुरुवारी सुद्धा सुरु होती.यात एकूण अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ३० तास तपासणी करून पाच अधिकारी आणि महत्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेऊन मुश्रीफ यांची चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ हे केंद्रीय तपस यंत्रणांच्या रडारवर होते. अंमलबजावणी संचालयाने गेल्याच महिन्यात हसन मुश्रीफ यांच्या कागल इथल्या घरावर छापा टाकला होता. त्या कारवाईनंतर हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेकडे आपला मोर्चा वळवला असून त्या अंतर्गत हि कालची कारवाई करण्यात आली.
महत्वाची कागदपत्रे आणि बँक अधिकारी ताब्यात काल अंमलबजावणी संचनालयाच्या पथकाने सकाळी दहा वाजता कोल्हापूर जिल्हा बँकेचे असणारे मुख्य कार्यालय आणि इतरही काही शाखांमध्ये कागदपत्रांची तपासणी केली , हि छाननी रात्री उशिरा पर्यंत चालूच होती. एकूण तीस तास त्यांनी कागदपत्रे आणि बँकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी चालू होती. सायंकाळी ह्या पथकाने बँकेतील एकूण पाच अधिकारी आणि काही महत्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. मुंबईला नेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी ए बी माने यांचा समावेश आहे. तर बाकीचे अधिकारी हे कर्जमंजुरी विभागातील आहेत.
बुधवारी सकाळी सुरु केलेली ही कारवाई सलग दोन दिवस चालूच होती. ईडीचे एकूण २२ अधिकारी दोन दिवस बँकेत ठाण मांडून होते. या काळात कुठल्याच कर्मचाऱ्याला ईडी अधिकाऱ्यांनी बाहेर जाऊ दिले नाही. दरम्यान अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने केलेल्या कारवाईत बँकेच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यामुळे बँकेतील इतर अधिकारी, कर्मचारी, यांनी आक्रमक पवित्र घेतला असून सर्व कर्मचाऱ्यांची दीर्घकाळ चौकशी केल्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग त्रासले आहेत. याशिवाय समन्सद्वारे कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यामुळे या सर्व कारवाईचा कर्मचारी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
माझ्या हत्येचा कट रचला जात आहे
आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल
इंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा “लाल”
हवाई अभ्यासच्यावेळी सुखोई – मिराज विमाने हवेत धडक
जेरुसलेमच्या प्रार्थनास्थळात घुसुन दहशत वाद्यांचा गोळीबार
याच विरोधात सर्व कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्र घेऊन ईडी मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या आहेत. भाजप नेतें किरीट सोमय्या यांनी याबाबतचा एक विडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केला आहे त्यात शेतकऱ्यांच्या नावावर खाती बनवून बँकेत कोट्यवधी रोख ठेवी असलेली बेनामी खाती मोठ्या प्रमाणांत बनवण्यात आली आहेत. आता तरी मुश्रीफ यांनी तो सर्व तपशील उघड करावा असे सोमैया यांचे म्हणणे आहे. मुश्रीफ हे जिल्ह्यातील सर्वोच्च सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. ईडीचे अधिकारी बँकेत पोचताच मुश्रिफ सुद्धा बँकेत दाखल झाले , त्यानंतर प्रसारमाध्यमांनी बोलताना मुश्रीफ म्हणाले साखर कारखान्यांना बेकायदेशीर पाने कर्ज वाटप केल्याचा आरोप असला तरी बँक अधिकाऱ्यांच्या स्क्रिनिंग कंमिटी शिवाय कर्ज मंजूर करण्यात आलेले नाही. माझे कोणतेच लॉकर नाही. किंवा बँकेत खाते सुद्धा नाही. मी अध्यक्ष झाल्यानंतर बँकेला नफाच झाला आहे. शिवाय आत्तापर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सारख्या कोणत्याच प्रशासकीय संस्थेने बँकेवर कुठलेच निर्बंध घातलेले नाहीत.