बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे कथित निकटवर्तीय अमित कात्याल यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी (८ ऑगस्ट) मोठी कारवाई केली आहे. अमित कात्याल यांची गुरुग्राममधील ७० एकर जमीन आणि फ्लॅट, मुंबईतील काही निवासी युनिट्स, दिल्लीतील एक फार्महाऊस आणि त्यांच्या रिअल्टी कंपन्यांच्या मुदत ठेवी, मनी लाँड्रिंग विरोधी कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आली आहे. ईडीने याबाबत माहिती दिली. फ्लॅट खरेदीदारांच्या पैशांचा गैरव्यवहार आणि दिल्ली-गुरुग्राममध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या अनेक नोंदी, ज्यामध्ये सरकारी नोकरीसाठी जमीन घोटाळासह अनेक प्रकरणे आहेत. या संदर्भात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
पीटीआय नुसार, लबजावणी संचालनालयाने एका निवेदनात म्हटले की, अमित कात्याल, क्रिश रियलटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि ब्रह्मा सिटी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रकरणात ११३.०३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यासाठी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) तात्पुरता आदेश ६ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आला होता. दरम्यान, अमित कत्याल यांना गेल्या वर्षी केंद्रीय एजन्सीने रेल्वेच्या कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित एका वेगळ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती, ज्यामध्ये लालू यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, मुलगा आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी खासदार कन्या मीसा भारती आदींचा समावेश आहे.
हे ही वाचा:
कुत्रा अंगावर पडून चिमुकलीच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी कुत्र्याच्या मालकाला अटक
“नीरजला मिळालेले रौप्य पदक हे सुवर्ण पदाकासारखेच”
भुवनेश्वर येथे एटीएमधून मिळणार गहू-तांदूळ !
काकांची पुंगी निघाली नागोबा डूलाया लागला
दरम्यान, गुरुग्राम पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या एफआयआरमधून हे मनी लाँड्रिंग प्रकरण समोर आले. या प्रकरणी ईडीने मार्चमध्ये छापे टाकले होते आणि २०० कोटी रुपयांच्या विदेशी गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे जप्त केल्याचा दावा एजन्सीने केला होता.