अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रविवारी(१२ मे) काँग्रेसचे आमदार आणि झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना समन्स बजावले आहेत. १४ मे रोजी रांची येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत.मंत्री आलमगीर आलम यांच्या सचिवाच्या नोकराच्या घरात पैशांचं घबाड नुकतेच सापडलं होत.यानंतर मंत्री आलम यांचे नाव चर्चेत आलं. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, याच प्रकरणाच्या चौकशीकरीता ईडीने मंत्री आलम यांना समन्स बजावले आहेत.
६ मे रोजी ईडीने मंत्री आलमगीर यांचे पर्सनल सेक्रेटरी संजीव लाल यांच्या घरगुती नोकराच्या घरावर छापा टाकला होता.जहांगीर आलम असे नोकराचे नाव असून ईडीने छापा टाकत त्याच्या घरातून तब्बल ३७ कोटींहून अधिक रुपयांची रोकडं जप्त केली होती.तसेच ईडीने नोकराच्या घरातून काही दागिनेही जप्त केले होते.यानंतर संजीव लाल आणि जहांगीर आलम या दोघांना अटक केली होती.
हे ही वाचा:
खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येप्रकरणी चौथ्या भारतीयाला अटक!
‘उद्धव ठाकरे हा निलाजरा माणूस’
लाल चौकाने बदलले रूपडे; फडकतोय भारताचा तिरंगा, नांदते शांतता, ग्रेनेड नाही, रक्त नाही
पीओकेत महागाईचा हाहाकार, नागरिक सुरक्षा दलासोबत भिडले, पोलिसाचा मृत्यू!
या प्रकरणी आता मंत्री आलमगीर आलम यांना ईडीने समन्स बजावले आहेत.१४ मे रोजी चौकशीसाठी रांची येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.दरम्यान, मंत्री आलम यांच्या चौकशीतून या प्रकरणाची नवीन माहिती समोर येते का ते पाहावे लागेल.दरम्यान, आलमगीर आलम हे पाकूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आहेत. तसेच सध्या ते झारखंड सरकारमध्ये त्यांच्याकडे ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. तसेच २००६ ते २००९ या दरम्यान ते झारखंड विधानसभेचे अध्यक्षही होते. आलमगीर आलम हे चारवेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.