गृह खात्याचे उपसचिव कैलास गायकवाड ईडीसमोर जाणार?

गृह खात्याचे उपसचिव कैलास गायकवाड ईडीसमोर जाणार?

महाराष्ट्राच्या गृह खात्याचे उपसचिव कैलास गायकवाड यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावली आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या १०० कोटी वसुलीच्या आरोपांच्या संदर्भात सक्तवसुली संचालनालयाने गायकवाड यांना चौकशीसाठी बोलावले आहे. एएनआय या वृत्त संस्थेने या संदर्भांतले ट्विट केले आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप झाले होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकत हे आरोप केले होते. या आरोपांमुळे राज्य चांगलेच हादरले होते. या प्रकरणात केंद्रातील तपास यंत्रणा सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी सक्रिय झाली असून तपास करत आहे.

याआधी अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर ईडीने धाडी टाकल्या असून त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे. आत्तापर्यंत देशमुख यांना ईडीकडून ५ वेळा समन्स पाठवण्यात आले आहे. पण पाच वेळा चौकशीसाठी बोलावणे येऊनही अनिल देशमुख एकदाही ईडीच्या चौकशीसाठी हजर राहिले नाहीत.

हे ही वाचा:

लक्ष्मी येणार सोन्याच्या बिस्किटावरून!

मोदींच्या योजनेने भारावले बिल गेट्स! म्हणाले….

बँकेतून होणारे ऑटो डेबिट बंद! वाचा काय आहेत नवीन नियम

अमरिंदर सिंग-अजित डोवाल भेटीत नेमके काय घडले?

त्यात आता राज्यातील गृह खात्याचे उपसचिव कैलास गायकवाड़ यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले असल्यामुळे देशमुख यांच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर गायकवाड हे चौकशीला हजार राहणार का? की ते देखील देशमुखांप्रमाणे ईडी पासून पळ काढणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version