बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या कंपनीवर ईडीचा छापा!

इंडिया सिमेंट ही देशातील सर्वात मोठी सिमेंट कंपन्यांपैकी एक

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या कंपनीवर ईडीचा छापा!

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या कंपनीवर छापा टाकला आहे.चेन्नई येथे असलेल्या इंडिया सिमेंट कंपनीवर ईडीने छापा टाकला आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन.श्रीनिवासन हे इंडिया सिमेंट्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि उपाध्यक्ष आहेत. इंडिया सिमेंट ही देशातील सर्वात मोठी सिमेंट कंपन्यांपैकी एक आहे.इंडिया सिमेंटचे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे ७ प्लांट आहेत.विशेष म्हणजे, २००८ ते २०१४ पर्यंत, इंडिया सिमेंट्सकडे इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जची थेट मालकी होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या पथकाने एन. श्रीनिवासन यांच्या कंपनीवर छापा टाकला आहे.चेन्नईतील इंडिया सिमेंट्सच्या ठिकाणांवर ईडीच्या पथकाकडून छापा टाकण्यात आला आहे.एन. श्रीनिवासन हे इंडिया सिमेंटचे उपाध्यक्ष आणि एमडी आहेत.ईडीच्या छाप्यात एन. श्रीनिवासन यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

अर्थसंकल्पात मोठी घोषणा; आशा, अंगणवाडी सेविकांना ‘आयुष्मान भारत’चा लाभ मिळणार

“गरीब, महिला, युवा, अन्नदाता यांच्यावर लक्ष केंद्रीत”

“सर्वांचा पाठिंबा, विश्वास, प्रयत्न या मंत्रानेचं पुढे जातोय”

इम्तियाज जलील यांच्यासह ५०० आंदोलकांवर गुन्हा दाखल

दरम्यान, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अंमलबजावणी संचालनालय सातत्याने कारवाई करत आहे. राजकारण्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत कारवाईच्या कक्षेत आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. जमीन घोटाळ्याच्या आरोपांमुळे हेमंत सोरेन यांना झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ते आता ईडीच्या ताब्यात आहेत.

Exit mobile version