सपा नेता विनय तिवारींच्या कंपनीत भ्रष्टाचाराची ‘गंगोत्री’; ईडीचे छापे!

नेत्याविरुद्ध आरोपपत्र पत्र तयार करून लवकरच न्यायालयात हजर करणार

सपा नेता विनय तिवारींच्या कंपनीत भ्रष्टाचाराची ‘गंगोत्री’; ईडीचे छापे!

उत्तर प्रदेशातील सपा नेते विनय शंकर तिवारी यांच्या ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज (७ एप्रिल) पुन्हा मोठी कारवाई केली आहे. सपा नेत्याच्या गंगोत्री एंटरप्रायझेस कंपनीच्या सुमारे १० ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. सुमारे ७०० कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची माहिती आहे.

चिल्लूपरचे माजी आमदार विनय शंकर तिवारी यांच्या लखनौ, गोरखपूर ते मुंबई अशा ठिकाणांवर ईडीने एकाच वेळी छापे टाकले आहेत. सोमवारी ईडीने गंगोत्री एंटरप्रायझेसच्या कार्यालयांवर एकाच वेळी छापे टाकले. ईडीने त्याच्याविरुद्ध आरोपपत्र तयार केले आहे. त्याला लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे.

ईडीच्या तपासात असे दिसून आले की मेसर्स गंगोत्री एंटरप्रायझेस लिमिटेडने त्यांच्या प्रवर्तक, संचालक आणि हमीदारांसह बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील सात बँकांच्या संघाकडून ११२९.४४ कोटी रुपयांच्या कर्ज सुविधांचा लाभ घेतला होता. नंतर त्याने ही रक्कम इतर कंपन्यांकडे वळवली आणि बँकांना पैसे परत केले नाहीत. यामुळे बँकांच्या संघाला सुमारे ७५४.२४ कोटी रुपयांचे नुकसान झाले.

हे ही वाचा : 

कुपवाड्यातील छाप्यात सापडली चिनी बनावटीची दुर्बीण, मशिनगन, हॅन्डग्रेनेड!

समन्स चुकवल्यानंतर कामराची एफआयआर रद्द करण्यासाठी धावाधाव

भोंग्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या सोमय्यांना धमकी; काय म्हणाले किरीट सोमय्या?

कोलकाता: रामनवमीच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या हिंदू भाविकांवर हल्ला

ईडीने आधीच मालमत्ता जप्त केल्या आहेत
नोव्हेंबर २०२३ मध्ये माजी आमदार विनय शंकर तिवारी यांच्या ७२.०८ कोटी रुपयांच्या मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केल्या होत्या. विनय तिवारी यांच्या कंपनी गंगोत्री एंटरप्रायझेस लिमिटेडने बँकांच्या संघाकडून सुमारे ११२९.४४ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणात ईडीने ही कारवाई केली होती. बँकांच्या तक्रारीवरून, सीबीआय मुख्यालयाने गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर ईडीने विनय तिवारीसह कंपनीच्या सर्व संचालक, प्रवर्तक आणि जामीनदारांविरुद्ध मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली.

२०२३ मध्ये, ईडीच्या राजधानीतील क्षेत्रीय कार्यालयाने गोरखपूर, महाराजगंज आणि लखनऊ येथील विनय शंकर तिवारी यांच्या एकूण २७ मालमत्ता जप्त केल्या होत्या. यामध्ये शेतीची जमीन, व्यावसायिक संकुले, निवासी संकुले, निवासी भूखंड इत्यादींचा समावेश आहे.

चेपव, चेपव, चेपवले... | Amit Kale | Sharad Pawar | Ajit Pawar | Supriya Sule | Sunetra Pawar |

Exit mobile version