पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. मंगलदास बांदल यांची ८५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.
पुणे, सोलापूर आणि अहमदनगर येथील तब्बल ८५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मंगलदास बांदल यांच्यासह हनुमंत खेमदारे आणि सतीश यादव यांच्यावर देखील कारवाई करत त्यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मंगलदास बांदल यांच्यावर कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे.
मंगलदास बांदल हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. लोकसभा निवडणुकीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बांदल यांनी प्रचार केला होता. यापूर्वी पथकाने मनी लॉड्रिंग प्रकरणी मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडीतील निवासस्थानी २१ ऑगस्ट रोजी छापे टाकले होते. त्यानंतर ईडीने बांदल यांना अटक केली होती.
हे ही वाचा :
बाबा सिद्दिकी हत्या: मुख्य संशयित शुभम लोणकर विरोधात लुक आउट सर्क्युलर जारी
न्या. संजीव खन्ना होणार भारताचे नवे सरन्यायाधीश
न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली अन् हातात तलवारीच्या जागी संविधान
विमानांना वारंवार मिळणाऱ्या धमक्यांचा केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून निषेध