मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय पथकाने सोमवारी (७ ऑक्टोबर) पंजाबमधील आम आदमी पार्टी राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीमने जालंधर आणि लुधियानामध्येही छापे टाकले आहेत. दरम्यान, या छाप्यावरून आम आदमी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत केंद्रीय एजन्सी सतत खोट्या केसेस बनवण्यात गुंतल्याचा आरोप केला आहे.
आप खासदार संजीव अरोरा यांच्यावर फसवणूक करून जमीन घेतल्याचा आरोप आहे. संजीव अरोरा यांच्याशिवाय प्रसिद्ध उद्योगपती हेमंत सूद यांच्या घरावरही ईडीच्या पथकाने छापा टाकला आहे.
एबीपी हिंदीच्या बातमीनुसार, ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले असून त्यात दिल्लीचाही समावेश आहे. संजीव अरोरा व्यतिरिक्त त्याचे सहकारी हेमंत सूद हे देखील ईडीच्या निशाण्यावर असून टीम त्यांच्या परिसरावर छापे टाकत आहे. हेमंत सूद हा मोठा रिअल इस्टेट व्यावसायिक आहे.
हे ही वाचा :
चेन्नईमध्ये एअर शो बघायला लाखोंची गर्दी; पाच जणांचा मृत्यू
चिनी नागरिकांना लक्ष्य करून कराचीमधील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आत्मघाती हल्ला
दुर्गेचे पाचवे रूप ‘स्कंदमाता’ – शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी!
कामं मार्गी लागली, आता मत मिळणार का ? |
दरम्यान, ईडीच्या छाप्याबाबत संजीव अरोरा यांनी ट्वीटकरत म्हटले की, ‘मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे, शोध मोहिमेचे कारण मला माहीत नाही, एजन्सींना पूर्ण सहकार्य करेन आणि त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील याची काळजी घेईन, असे अरोरा यांनी म्हटले.