दिल्लीला लागून असलेल्या फरिदाबादमध्ये ईडीच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे.सायबर फसवणूक प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या पुनीत कुमारच्या एका बँक लॉकरमधून तब्बल १९.५ किलोची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत.या सोन्याची किंमत तब्बल १४ कोटी रुपये इतकी असल्याची माहिती आहे.फरीदाबादच्या बल्लभगढ येथील इंडियन बँकेच्या शाखेतून ही सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली असून हे बँक लॉकर पुनीत कुमारच्या आईच्या नावाने होते.
या संदर्भात ईडीने सांगितले की, पुनीत कुमारने ही सोन्याची बिस्किटे इंडियन बँकच्या लॉकरमध्ये लपवून ठेवली होती.हे लॉकर त्याच्या आईच्या नावाने आहे, याची गुप्त माहिती आम्हाला मिळाली होती.त्या माहितीच्या आधारे आम्ही कारवाई करत १९.५ किलोची सोन्याची बिस्किटे जप्त केली आहे, ज्याचा बाजारभाव १४ कोटींहून अधिक आहे.
हे ही वाचा:
मंगेशकर कुटूंब भाऊ तोरसेकरांना ऐकते तेव्हा…
‘दीपस्तंभ’ला समाजसेवेच्या कार्याची पोचपावती मिळाली!
पूंछ हल्ल्याप्रकरणी दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी, २० लाखांचे बक्षीस जाहीर!
‘४ जून ही बीजेडी पक्षाची एक्स्पायरी डेट’
ED, Hqrs. office has recovered and seized 19.500 Kg of Gold valued at Rs.14.04 Crore from the locker of Punit Kumar, maintained in the name of his mother with Ballabhgarh branch of Indian Bank, Faridabad, Haryana on 03.05.2024. During investigation under PMLA,2002, Punit Kumar @… pic.twitter.com/8I0OX0FN38
— ED (@dir_ed) May 6, 2024
सायबर फसवणूक प्रकरणी पुनीत कुमारला ३ एप्रिल रोजी दिल्ली विमानतळावर पोलिसांनी अटक केली होती.त्याच दिवशी त्याला नवी दिल्लीतील कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला १२ दिवसांची ईडी कोठडी सुनावली.सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.ईडीने या अगोदरही कारवाई करत पुनीतच्या घरातून लाखो रुपये, दागिने, कार आणि महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.