संदेशखळी येथे अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे.आरोपी शेख शहाजहानसह त्याच्या जवळीक मित्रांची १४ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये शहाजहानसह त्याचे दोन आणि मित्र यांच्या संपत्तीचा समावेश आहे.
जमीन बळकावल्याप्रकरणी पीएमएलए अंतर्गत ईडीने ही कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेली प्रॉपर्टी ही संदेशखळी येथील लोकांच्या जमिनीवर जबरदस्तीने कब्जा करून बांधण्यात आली होती, ती आता ईडीने जप्त केली आहे.यामध्ये शेख शाहजहानचे दोन भाऊ आलमगीर आणि शिराजुद्दीन आणि त्यांचा जवळीक असलेला मित्र शिव प्रसाद हाजरा यांची मालमत्ता आणि बँक खाती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.तब्बल १४ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. या प्रकरणात, ईडीने आतापर्यंत २८८ कोटी रुपयांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा शोध लावला आहे. या प्रकरणी ईडीने आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे.
हे ही वाचा:
‘मीडियातले पत्रकार स्वतःच्या विचारसरणीचा प्रचार करत आहेत!’
“उद्धव ठाकरे जे पांचट जोक, टोमणे मारतात, ते शोभणारे नाही!”
कोकण रेल्वे आता बोरिवलीवरून सुटणार
एमडीएच, एव्हरेस्ट मसाल्यांच्या आयातीवर आणि विक्रीवर नेपाळकडून बंदी
यापूर्वी मार्च २०२४ मध्ये ईडीने शेख शाहजहानची सुमारे १२.७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यावेळी, ईडीने १४ स्थावर मालमत्ता आणि टीएमसी नेत्याची दोन बँक खाती जप्त केली होती. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये अपार्टमेंट, शेतजमीन,संदेशखळी आणि कोलकाता मधील जमीन आणि इमारतींचा समावेश आहे.