काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्स काऊंटी क्रिकेट क्लबला १२ अंकी दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे ससेक्ट काऊंटी क्रिकेट क्लबचा कर्णधार चेतेश्वर पुजारा याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. ईसीबीने व्यावसायिक सामन्यांसाठी आखलेल्या नियमानुसार, ही कारवाई करण्यात आली आहे. ससेक्सला एका हंगामात चार पेनल्टी मिळाल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.
‘१३ सप्टेंबर २०२३ रोजी लिस्टरशायरविरोधात काऊंटी चॅम्पियनशिपच्या सामन्यात ससेक्स सीसीबीला दोन अतिरिक्त पेनल्टी पॉइंट्स मिळाले आहेत. त्यामुळे ससेक्स सीसीबीने या हंगामातील चार निश्चित दंडाची मर्यादा ओलांडली आहे. याआधी याच हंगामात सीसीबीला दोन पेनल्टी पॉइंट्स मिळाले आहेत,’ असे ईसीबीने आपल्या निवेदनात जाहीर केले आहे. त्यामुळे सीसीबीचा कर्णधार चेतेश्वर पुजारा याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे तो पुढील सामना खेळू शकणार नाही.
हे ही वाचा:
खलिस्तानी अतिरेक्याच्या हत्येसंदर्भात कॅनडाने केलेल्या वक्तव्याचा भारताने केला धिक्कार
जुन्या संसद भवनाला ‘संविधान सदन’ असे नामकरण करण्याची सूचना
तामिळ संगीतकार, अभिनेता विजय अँटनी यांच्या मुलीने केली आत्महत्या !
खर्गेचे G2 आणि गोयल म्हणाले 2G, One G, son G !
कर्णधार पुजाराला नियमानुसार, निलंबित करण्यात आले आहे आणि ससेक्सनेही या निर्णयाला आव्हान न देता हा निर्णय स्वीकारला आहे. याआधी टॉम हॅन्स, जॅक कार्सन आणि एरी कार्वेलस या खेळाडूंनाही त्यांच्या वर्तणुकीमुळे डर्बिशायरविरोधातील सामन्यात निवडण्यात आले नव्हते. त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना संघाबाहेर ठेवण्यात आले होते.