मागच्या आठवड्यात भारताच्या पश्चिम किनारपट्टीला तौक्ते वादळाने झोडपून काढल्यानंतर आता पूर्व किनाऱ्यावर यास हे चक्रीवादळ धडकणार आहे. त्यामुळे पूर्व किनारपट्टीवरील राज्यांनी आणि प्रशासनाने तयारी करायला सुरूवात केली आहे. पूर्व रेल्वेनेसुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून २५ रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत.
या संबंधी रेल्वेने एक पत्रक देखील प्रसिद्ध केले आहे. यास चक्रीवादळात खबरदारीचा उपाय म्हणून गाड्या रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. २४ ते २९ मे दरम्यानच्या विविध ठिकाणी जाणाऱ्या पूर्व रेल्वेच्या अखत्यारितल्या गाड्या करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा:
‘ठाकरे सरकारचा पॅकेज देण्यावर विश्वास नाही, घेण्यावर आहे’
काँगोमध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर सहाय्यास धावली भारतीय सेना
म्युकरमायकॉसिसवरील मोफत उपचारांवरच ‘बुरशी’
भारतात ऑगस्टपासून दरमहिना तयार होणार ४ कोटी स्पुतनिक डोस
यापूर्वी देशातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे गाड्यांमधील प्रवासी संख्या घटल्याने रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या होत्या. मुंबईत मात्र उत्तर आणि पूर्व भारताकडे अनेक मजूरांनी स्थलांतर करायला सुरूवात केली होती. त्यामुळे त्या दिशेने जाणाऱ्या विशेष गाड्या मध्य रेल्वेला सोडाव्या लागल्या होत्या. सध्या कोविड काळातील प्रवासी निर्बंधांमुळे रेल्वेची प्रवासी संख्या घटली आहे.
रेल्वेने कोविड काळात देदिप्यमान कामगिरी ऑक्सिजन पुरवून केली आहे. अनेक राज्यांसाठी रेल्वेच्या ऑक्सिजन एक्सप्रेस वरदायी ठरल्या होत्या. कित्येक कोविड रुग्णांचे प्राण रेल्वेने वेगाने ऑक्सिजनचा पुरवठा करून वाचवले आहेत. भारतीय रेल्वे सातत्याने संकट काळात देशवासीयांच्या मदतीला धावली आहे.