पूर्व किनाऱ्यावर ‘यास’ वादळाची पूर्वतयारी

पूर्व किनाऱ्यावर ‘यास’ वादळाची पूर्वतयारी

भारताचा मान्सून अंदामानात दाखल झाला आहे. मान्सून बरोबरच बंगालच्या उपसागरात वादळाची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी सावधगिरी बाळगायला सुरूवात केली आहे.

ओडिशाचे प्रधान सचिव मोहपात्रा यांनी वादळाची तयारी म्हणून विविध खात्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये एनडीआरएफ, तटरक्षक दल, आयएनएस चिलिका, पोलिस महासंचालक, अग्निशमन दल महासंचालक यांचा समावेश होता. त्याबरोबरच भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार विविध विद्युत कंपन्यांचे अधिकारी, ग्रामीण आणि शहरी भागातील पाणी पुरवठा अधिकारी, आरोग्य अधिकारी, ओडिशा आपात्कालिन परिस्थिती नियंत्रण बल, आणि एनडीआरएफच्या विविध तुकड्यांना सावधगिरी बाळगण्याची सुचना देखील देण्यात आली आहे. मोहपात्रा यांनी हे देखील सांगितले की वादळासाठी सुरक्षित अशा इमारती आणि आडोशाच्या जागा सुनिश्चित करण्याचे काम देखील युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

ॲड. प्रदिप गावडेंवर ठाकरे सरकारची ‘तत्पर’ कारवाई

एअर इंडियावर सायबर हल्ला, प्रवाशांचा डेटा धोक्यात?

कोरोना आणि ५जी चा काहीही संबंध नाही

कौटुंबिक वादातून महिलेने रेतीबंदर खाडीत मारली उडी

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या वादळासाठी राज्याचे संपूर्ण प्रशासन तयार होत आहे. येणाऱ्या दोन-तीन दिवसात वादळाबाबत अधिक स्पष्टता मिळाल्यानंतर कोणत्या क्षेत्रावर अधिक लक्ष द्यायचे हे ठरवता येणार आहे. विशेष सहाय्य आयुक्त प्रदिप के जेना यांनी दिलेल्या माहितीनुसार मत्स्य विभागाने मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या सर्व मच्छिमारांना किनाऱ्यावर येण्याचे निर्देश दिले आहेत. त्यापैकी ३९ मच्छिमारांना वगळता सर्व किनाऱ्यावर बोलावले आहे. हे ३९ मच्छिमार देखील शनिवारपर्यंत किनाऱ्यावर दाखल होतील. जेना यांनी सांगितले की पारादिप येथील तटरक्षक दलाच्या नौका आणि विमाने मच्छिमार नौकांना किनाऱ्यावर येण्यासा सहाय्य करण्यासाठी गस्त घालत आहेत.

Exit mobile version