मालदिवच्या दोन मंत्र्यांसह एका लोकप्रतिनिधीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या निषेधार्थ ईजमायट्रिप कंपनीचे सीईओ निशांत पिट्टी यांनी कंपनीच्या मालदिवला जाणाऱ्या सर्व विमानांचे बुकिंग स्थगित केले आहे. कंपनीने ऑनलाइन सुरू असलेल्या ‘बॉयकॉट मालदिव’ या मोहिमेला बळ देऊन विमानाचे बुकिंग रद्द केले आहे.
भारताला पाठिंबा देताना ‘ईजमायट्रिप’ या ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निशांत पिट्टी यांनी ‘एक्स’वर याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.
‘आमच्या देशाच्या पाठिशी उभे राहण्यासाठी ईजमायट्रिपने मालदीवच्या सर्व फ्लाइट बुकिंग स्थगित केल्या आहेत,’ असे त्यांनी सांगितले. या कंपनीचे मुख्यालय दिल्लीत आहे. या कंपनीची स्थापना सन २००८मध्ये निशांत पिट्टी, रिकांत पिट्टी आणि प्रशांत पिट्टी यांनी केली आहे.४ जानेवारीला केलेल्या पोस्टमध्ये प्रशांत पिट्टी म्हणतात, ‘लक्षद्वीपचे पाणी आणि समुद्रकिनारे हे मालदिव आणि शेसेल्सइतकेच सुंदर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेल्या या ठिकाणाला एक पर्यटनस्थळ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही ईजमायट्रिपच्या माध्यमातून स्पेशल ऑफर्स आणल्या आहेत.’
हे ही वाचा:
२२ जानेवारीला आसाममध्ये ‘ड्राय डे’
रामलल्लाच्या सोहळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी मुस्लिम कुटुंब बनवत आहे ‘राम नावाच्या टोप्या’!
अवैध खाणकाम प्रकरणी लोकदलचे माजी आमदार दिलबाग सिंग अटकेत
महिला पोलिसांवरील अत्याचाराचे पत्र बनावट, पत्र व्हायरल करणाऱ्याचा शोध सुरू
भारत आणि मालदिवमधील वादाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर #बॉयकॉट मालदिव हा हॅशटॅग ट्रेन्डमध्ये आहे. तसेच, अनेक भारतीय पर्यटकांनी मालदिवचे बुकिंग रद्द केल्याचे सांगितले जात आहे.मालदिवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यावर सेलिब्रेटिनींही परदेशी ठिकाणांपेक्षा भारतातील बेटे आणि समुद्रकिनाऱ्यावर नक्की भेट द्यावी, असे आवाहन केले आहे. सलमान खान, अक्षय कुमार या चित्रपट अभिनेत्यांसह क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, व्यंकटेश प्रसाद, विरेंद्र सेहवाग यांनीही मालदिवच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला आहे.