निर्बंध हटवा, आम्हाला जगू द्या

निर्बंध हटवा, आम्हाला जगू द्या

महाबळेश्वरच्या व्यापाऱ्यांची मागणी

‘महाबळेश्वर, पाचगणीमधले निर्बंध ह़टवा, आम्हाला जगू द्या. कोरोना आणि लॉकडाऊनने आम्ही उध्वस्त झालोय. पण आता परिस्थिती पूर्ववत होत असताना आमचाही विचार करा. आमचे व्यवसाय सुरु करण्यासाठी परवानगी द्या’, अशी मागणी महाबळेश्वर, पाचगणीमधल्या व्यापाऱ्यांनी साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता पॉझिटिव्हिटी रेट विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने निर्बंध कडक केले आहेत. याचा फटका इतर घटकांबरोबर जिल्ह्यातील पर्यटनाला बसला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनने मागील काही महिने दुकाने बंद असल्याने दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये माथेरान पॅटर्न लागू करावा, अशी मागणी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.

सातारा शासकीय विश्रामगृहात महाबळेश्वर आणि पाचगणी या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन माथेरान पर्यटन स्थळावर ज्या पद्धतीने प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत, त्या नियमावली नुसार महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटन स्थळावरचे निर्बंध शिथिल करावेत या मागणीची निवेदन देण्यात आले.

व्यापाऱ्यांची अडचण समजू शकतो. येत्या काही दिवसांत कोरोनाची स्थिती पाहता आणि आकडेवारी पाहून योग्य तो निर्णय घेतला जाईल जेणेकरुन व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्र्यांना व्यापाऱ्यांशी बोलताना व्यक्त केला.

हे ही वाचा:

भारत- श्रीलंका मालिकेलाही कोरोनाचा फटका

रेल्वेमंत्र्यांनी कर्मचाऱ्याला मिठी का मारली?

‘या’ बँकेचं १००% खासगीकरण होणार

भावजयीवर ऍसिड हल्ला

साताऱ्याचा कोरोना संसर्ग दर वाढ पाहता जिल्हाधिकारी शेखर निकम यांनी जिल्ह्यासह पाचगणी महाबळेश्वर पर्यटन स्थळीही निर्बंध जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने जिल्ह्यातील व्यापारी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. पर्यटन स्थळ असणाऱ्या महाबळेश्वर पाचगणी मध्येही हीच नियमावली लागू केली असल्यामुळे या ठिकाणच्या स्थानिक व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन पाचगणी महाबळेश्वर पर्यटन स्थळ असल्याने माथेरान सारखी वेगळी नियमावली जाहीर करा अशी मागणी केली आहे.

Exit mobile version