भारताच्या अंदमान निकोबार बेटावर शनिवारी रात्री जोरदार भूकंप झाला होता. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसच्या मते भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर स्केल नोंदली गेली होती. त्यानंतर अंदमान बेटावर गुरुवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्ट स्केलवर ४.३ एवढी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली आहे. या भूकंपामध्ये अद्याप कोणतीही जीवीत किंवा वित्तहानी झाल्याची माहीती समोर आलेली नाही.
यापूर्वी बुधवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी ५.४० वाजता अंदमान बेटावर भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ५.० एवढी होती. यापूर्वी २९ जुलै रोजी अंदमान आणि निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ५.८ मॅग्नीट्युड रिश्टर स्केल इतकी होती. मध्यरात्री १२ वाजून ५३ मिनीटांनी झालेला हा भूकंप पोर्ट ब्लेअर पासून दक्षिण पूर्वेला १२६ किलोमीटर झाल्याची माहीती एनसीएसने ट्वीट करत दिली होती.
शनिवारी रात्रीची वेळ असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. काही जण घराबाहेरही आले. त्यानंतर मात्र कोणतेही भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत. मात्र नागरिकांनी संपूर्ण रात्र घाबरलेल्या मनस्थितीतच काढली. गेल्या वर्षी अंदमान निकोबारमध्ये २४ तासांत ३.८ ते ५ तीव्रतेचे २२ भूकंप झाले होते.
हे ही वाचा:
विजय वडेट्टीवार नवे विरोधी पक्ष नेते, सभापतींची घोषणा
अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून ज्ञानव्यापी मशीद सर्वेक्षणाला हिरवा झेंडा
पुण्यातून पावणेदोन कोटी रुपये किंमतीचे अफीम जप्त
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह लिहिणाऱ्या ‘शिदोरी’ वरही गुन्हा दाखल करणार
अरुणाचल प्रदेशमध्ये शुक्रवारी सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी भूकंप आला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, अरुणाचल प्रदेशातील पैंगिनच्या उत्तरेकडील भागात भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केवर या भूकंपाची तीव्रता ४.० नोंदली गेली. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. याआधी अरुणाचलच्या तवांगमध्ये २२ जुलै रोजी ३.३ तीव्रतेचा भूकंप झाला होता.