चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग होत असतानाचं जाणवला भूकंपाचा धक्का

भूकंपाची तीव्रता ३ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली

चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग होत असतानाचं जाणवला भूकंपाचा धक्का

सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाच्या परिसरात भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती आहे. बुधवार, २४ जुलै रोजी पहाटे भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ३ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. शिराळा तालुक्यातील वारणावती परिसरात सुमारे आठ किलोमीटर परिसरात भूकंपाचे हादरे जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे.

सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाच्या परिसरात बुधवारी पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांनी चांदोली धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच हा भूकंप झाला त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या काही दिवसांपासून सांगलीत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली असून चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. यावेळीच भूकंपाचे हादरे जाणवले.

सध्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, हा भूकंप सौम्य असल्यामुळे चांदोली धरणाला कोणताही धोका नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सांगलीमधील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गेत्यामुळे हे धरण ८२ टक्के भरले असून पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मात्र, त्याचवेळी भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

हे ही वाचा:

बेवारस रुग्णांना अज्ञात स्थळी सोडणारा ससूनचा डॉक्टर निलंबित

पत्रकार प्रदीप भंडारी आता भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते !

आमदार अतुल भातखळकर भाजपाच्या माध्यम विभागाचे केंद्रीय समन्वयक

अर्थसंकल्पात आदिवासींसाठी ‘प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियान’

काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली, जालना अशा चार जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी होती. विदर्भातील वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते.

Exit mobile version