दिल्लीसह उत्तर भारत हादरला!

नेपाळमध्ये ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप

दिल्लीसह उत्तर भारत हादरला!

राजधानी दिल्लीमध्ये आणि उत्तर भारतातील काही भागात मंगळवार, ३ ऑक्टोबर रोजी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सुमारे एक मिनिट भूकंपाचे धक्के जाणवत होते आणि या भागातील इमारती देखील हादरत राहिल्या होत्या. नेपाळमध्ये ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामुळे दिल्ली-एनसीआर प्रदेशासह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये जोरदार हादरे जाणवले.

काही दिवसांपूर्वी दिल्लीसह आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. यानंतर पुन्हा मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या म्हणण्यानुसार, दुपारी २ वाजून २० मिनिटांनी ४.२ रिश्टर स्केलचा पहिला भूकंप झाला. त्यानंतर ६.२ रिश्टर स्केलचा सलग दुसरा भूकंप झाला. या भूकंपामुळे दिल्लीसह आसपासच्या परिसरात अनेक वेळ धक्के जाणवले. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी आणि वित्तहानी झालेली नाही.

हे ही वाचा:

मुंबईमधील स्विमिंग पूलमध्ये शिरली मगर

नांदेड मधील रुग्णांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होईल!

बांगलादेशात नऊ महिन्यात डेंग्यूने घेतेले १ हजारहून अधिक बळी

ऍमेझॉनमध्ये पाण्याचे तापमान वाढले; १००हून अधिक डॉल्फिनचा मृत्यू

यावेळी इमारती हादरत असताना केंद्रीय मंत्री मनसूख मांडवीय यांचा निर्माण भवन इमारतीतून बाहेर येतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय भूकंपाच्या धक्यावेळा निर्माण भवन इमारतीत होते. मात्र, भूकंपाचे धक्के जाणवत असताना ते तातडीने बाहेर आले. यावेळचा व्हिडीओ समोर आला आहे.

Exit mobile version