दिल्ली, उत्तर भारतासह नेपाळमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ आहे.

दिल्ली, उत्तर भारतासह नेपाळमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

दिल्ली आणि उत्तर भारताला काल उशिरा रात्री भूकंपाचे तीव्र धक्के बसलेत. तसेच आज पहाटे नेपाळमध्येसुद्धा भूकंपाचा धक्का बसला असून यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री २ च्या सुमारास भूकंपाचे दोन वेळा धक्के जाणवले. त्यामुळे उत्तर भारतासह नेपाळमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या मणिपूर इथे जमिनीपासून १० किलोमीटर खोल असल्याची माहिती मिळत आहे. या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती. पाच तासांमध्ये उत्तर भारतात दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तर नेपाळमध्ये २४ तासांत तीन वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. नेपाळमधील डोटी जिल्ह्यामध्ये पहाटेच भूकंप झाल्याची घटना घडली. या भूकंपात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. या भूकंपामध्ये मृत्यू झालेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र मृतांमध्ये एक महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. नेपाळच्या लष्कराकडून बचावकार्य केले जातं आहे.

हे ही वाचा:

भारत जोडो यात्रेत शरद पवारांऐवजी ; दुसरे नेते होणार सामील

कुनोच्या राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांनी केली ‘पहिली’ शिकार

टीम इंडियाने गोलंदाजांसाठी सोडल्या बिझनेस क्लास सीट्स

सुधा मूर्ती संभाजी भिडेंना भेटल्या आणि…

याआधी मंगळवारीसुद्धा लखनौसहित उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता ४.९ रिश्टर स्केल असल्याचे सागितले जातं आहे. हा भूकंप उत्तर प्रदेशामधील लखनौ, मुरादाबाद, मेरठ, बरेली अशा शहरांमध्ये जाणवले. तर एनसीआर परिसरातल्या फरीदाबाद, गुरुग्राम, ग्रेटर नोएडा या भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तराखंडमधील चमोली, अल्मोडा, रुद्रप्रयाग, पौडी आणि गढवाल जिल्ह्यात या भूकंपामुळे जमिनीला तीव्र हादरे बसलेत. पण अद्याप या भागांत कोणतीही जीवितहानी किंवा दुर्घटना झाल्याचे समोर आलेले नाही.

Exit mobile version