नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिल्ली भूकंपाने हादरली

कोणतीही जीवितहानी नाही

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिल्ली भूकंपाने हादरली

रविवारी रात्री उशिरा लोक नवीन वर्षाच्या उत्सवात मग्न असतानाच दिल्लीत भूकंपाचा धक्का बसला आहे. दिल्ली आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. साधारणपणे मध्यरात्रीच्या सव्वा वाजण्याच्या सुमारास हे धक्के बसले असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३. ८ इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीला भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

या भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील झज्जर येथे होता . त्याची खोली जमिनीखाली ५ किमी होती.यापूर्वी २९ नोव्हेंबरला दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. येथेही भूकंपाची तीव्रता रेक्टर स्केलवर २.५ मोजण्यात आली.नवी दिल्लीचा पश्चिम भाग हा भूकंपाचा केंद्रबिंदू होता, ज्याची खोली पाच किलोमीटर होती.

यापूर्वी दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडमध्ये १२ नोव्हेंबरला दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. भूकंपानंतर लोक घरातून आणि कार्यालयातून दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, बिजनौरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

हे ही वाचा:

निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे?

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?

ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश

स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?

३० डिसेंबर २०२२ रोजी मणिपूरच्या उखरुलमध्ये ४.१ तीव्रतेचा भूकंप झाला होता. भूकंपाची खोली जमिनीच्या खो ली १३० किमी होती. आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये २९ डिसेंबरला ३.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. भूकंपाची खोली जमिनीखाली १०किमी होती. हा भूकंप दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झाला होता.

Exit mobile version