31 C
Mumbai
Wednesday, April 9, 2025
घरविशेषसोलापुरात भूकंपाचे सौम्य धक्के!

सोलापुरात भूकंपाचे सौम्य धक्के!

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Google News Follow

Related

सोलापूर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढ्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत. सांगोला हा केंद्र बिंदू असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने ट्विट करत याबाबत माहिती दिली. दरम्यान, या घटनेमुळे कोणतेही नुकसान झाले नाही.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा येथे २.६ रेक्टर स्केल भूकंपाच्या तीव्रतेचे धक्के जाणवले. साधारणपणे आज सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी काही क्षणासाठी हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान, या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. भूकंपाच्या धक्क्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हे ही वाचा : 

फटकेबाजी, चौकार-षटकारांचा पाऊस आणि ऑरेंज कॅपची शर्यत!

विराटच्या बोटाला लागलंय; पण आरसीबीच्या नशिबाला?

पीपीएफ खात्यात वारस अपडेटसाठी आता पैसे द्यावे लागणार नाहीत

भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्राची भरारी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर तब्बल ३ हजार हून अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत. सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरु आहे. भारताचे जवान देखील बचावकार्यात सहभागी आहेत.

मृतांच्या आकडेवारीमध्ये वाढ होण्याची शक्यात वर्तवली जात आहे. चार हजारहून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. परंतु, सुदैवाने आज सोलापुरात झालेल्या भूकंपाची तीव्रता कमी होती. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
241,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा