मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याला रविवारी पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. लोक झोपेत असताना आसपासच्या जवळपास ५० गावांना हा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.६ इतकी मोजली गेली आहे. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही हानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटलं आहे.
गावकरी झोपेत असतानाच अचानक जमिनीतून आवाज येऊ लागले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरून घराबाहेर पडले. पिंपळदरी येथील बापूराव घोंगडे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज सर्वात मोठा आवाज ऐकू आला.
हिंगोली जिल्ह्यातील विशेषत: वसमत, कलनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील गावांमध्ये गेल्या आठ-दहा वर्षांपासून जमिनीतून आवाज येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. भूगर्भातील सूक्ष्म हालचालींमुळे हे आवाज येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. हिंगोली हे भूकंपाच्या दृष्टीने कमी जोखमीचे क्षेत्रामध्ये वर्गीकृत आहे.
हे ही वाचा:
सानिया मिर्झाचा टेनिसला अलविदा
संजय राऊत तु जिथे बोलावशील तिथे यायला मी तयार
‘द रेझिस्टन्स फ्रंट’ दहशतवादी संघटनेवर बंदी
पिंपळदरी, राजदरी, सोनवडी, मळाळी, कंझारा, पुर, वसई, जामगव्हाण, जलालदाभा, काकडदाभा, वसमत तालुक्यातील पिंपळदरी, वापटी, कळमनुरी तालुक्यातील बोथी, दांडेगाव, सिंदगी, बोल्डा, या गावांना भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ आणि कळमनुरी तालुक्यातील सुमारे ४० ते ५० गावांना भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोलीत पाच किलोमीटर खोलवर होता.