पापुआ न्यू गिनीमध्ये अंबुता येथे भूकंपाचे धक्के जाणवले. याचे केंद्र जमिनीपासून ३५ किमी खोल होते. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने सांगितल्यानुसार, या भूकंपामुळे ऑस्ट्रेलियात त्सुनामीचा धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पापुआ न्यू गिनीमध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले. अमेरिकी भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने (यूएसजीएस) याबाबत अधिक माहिती दिली.
पापुआ न्यू गिनीच्या पूर्वेकडील सेपिक प्रांतामध्ये ६.९ तीव्रतेचा भीषण भूकंप आला, त्यामध्ये काही जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवेल, असा इशाराही देण्यात आला आहे. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसनेही याबाबत माहिती दिली. रविवारी उत्तर पापुआ न्यू गिनीच्या भागात ६.७ तीव्रतेचा भूकंप आला. भूकंपाचे केंद्र ६५ किमी खोल होते. या अधिकाऱ्यांनीही सध्या तरी त्सुनामीचा कोणताही धोका नाही, असे सांगितले आहे. तसेच, पुन्हा भूकंप होईल, असा इशाराही त्यांनी दिलेला नाही. अद्याप भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
हे ही वाचा :
आयएसआयएसमध्ये सहभागी होण्यासाठी जाणारा आयआयटी गुवाहाटीचा विद्यार्थी ताब्यात!
कोलकात्याचा हैदराबादवर थरारक विजय!
आरसीबी पराभवानंतरही विराट कोहली सोशील मीडियावर व्हायरल
नवमतदारांचा नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद
६.९ रिश्टर स्केल म्हणजे भूकंपाची तीव्रता खूप मोठी मानली जाते. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. प्रशांत महासागरात पापुआ न्यू गिनी हे क्षेत्र भूकंपप्रवण ‘रिंग ऑफ फायर’मध्ये गणले जाते. येथे भूकंप येणे हे सर्वसाधारण मानले जाते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये येथे ७.० तीव्रतेचा भूकंप आला होता. त्यात सात जणांचा मृत्यू झाला होता.