नाशिकपाठोपाठ अरुणाचल प्रदेशही थरथरला

रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.८ इतकी मोजण्यात आली

नाशिकपाठोपाठ अरुणाचल प्रदेशही थरथरला

नाशिक आणि त्यापाठोपाठ अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, अरुणाचल प्रदेशमध्ये बुधवारी सकाळी ७.१५ वाजता भूकंप झाला. अरुणाचल प्रदेशातील बसरच्या उत्तर-पश्चिम-उत्तर दिशेला ५८ किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.८ इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाची खोली जमिनीखाली १० किमी होती.

बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्रातील नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ३.६ इतकी होती. नाशिकच्या पश्चिमेला ८९ किमी अंतरावर भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीखाली ५ किमी होती.

याआधी १२ नोव्हेंबरला दिल्लीत रात्री ८ वाजता दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते . नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, नेपाळमध्ये संध्याकाळी ७.५७ वाजता ५.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १० किमी खाली असल्याचे सांगण्यात आले. त्याआधी ८ नोव्हेंबरच्या रात्री दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

हे ही वाचा : 

व्हासटऍप व्हिडीओ कॉल आला आणि तरुण अडकला जाळ्यात

बारसू रिफायनरीतून विविध टप्प्यांवर ५ लाख रोजगार निर्मिती

आसाम-मेघालय सीमेवर हिंसाचार, गोळीबारात ६ जणांचा मृत्यू  

नशीब बलवत्तर… न्यूझीलंडचे ‘टाय टाय’ फीश

दिल्लीत झालेल्या भूकंपाचे धक्के भारत, चीन आणि नेपाळमध्येही जाणवले. दुपारी १ .५७ वाजता भूकंप झाला. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ६ .३ पर्यंत मोजली गेली. भारतातील दिल्ली, यूपी, बिहार, उत्तराखंड, दिल्ली, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र नेपाळ असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नेपाळमधील डोटी येथे घर कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला होता.

Exit mobile version