मराठवाड्यासह विदर्भाला ४.२ रिश्टर स्केल भूकंपाचा बसला धक्का

जीवितहानी झालेली नाही

मराठवाड्यासह विदर्भाला ४.२ रिश्टर स्केल भूकंपाचा बसला धक्का

राज्यात मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एका जिल्ह्याला भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. बुधवार, १० जुलै रोजी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने या वृताला दुजोरा दिला आहे. माहितीनुसार, मराठवाडा जिल्ह्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या तीन तर विदर्भातील वाशीम या एका जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अचानक बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वसमत तालुक्यातील पांगरा येथे भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती आहे. गेल्या सहा वर्षांपासून या भागात अनेक भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. हिंगोली शहरासह जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा, वसमत, दांडेगाव, पांगरा शिंदे, वारंगा, कुरूंदा, कवठा आणि इतर अनेक भागांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला. प्राथमिक माहितीनुसार सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी हा धक्का जाणवला आहे. भूकंपाचा हा धक्का ४.२ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता. अचानकपणे जमीन हादरल्याने अनेक ठिकाणी लोक भयभीत होऊन घराबाहेर आले.

हे ही वाचा:

तेजस ठाकरे अंबानींच्या कार्यक्रमात नाचले, झाली टीका!

फ्रान्समध्येही टॅक्टिकल वोटींगचा बोलबाला… फ्रेंच खिचडी शिजणार का?

गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक

म्हणे “धर्मनिरपेक्षतेसाठीच अल्पसंख्यांकांना राजकीय आरक्षण !”

सुदैवाने या भूकंपाच्या धक्क्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यानंतर स्थानिक प्रशासन आणि यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. तालुका प्रशासन नागरिकांची काळजी घेत आहे, अशावेळी नागरिकांनीही घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान तहसीलदार शारदा दळवी यांनी केले आहे.

Exit mobile version