काश्मिरला बसला भूकंपाचा धक्का

काश्मिरला बसला भूकंपाचा धक्का

केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये आज पहाटे भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.

गुरुवारी पहाटे ५.०८ वाजता जम्मू काश्मीरमधल्या यात्रेकरूंत प्रसिद्ध असलेल्या कटरा भागाला भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर परिसरातील नागरिकांचा थरकाप उडाला. परंतु, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारच्या जीवितहानी किंवा वित्तहानीची बातमी अद्याप समोर आलेली नाही.

विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या अगोदर ४ ऑगस्ट रोजी राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. पहाटे ४.०० वाजल्याच्या दरम्यान भूकंपाचा हादरा बसत असल्याचं जाणवल्यानंतर नागरिक भीतीनं घराबाहेर पडले होते. त्यावेळच्या भूकंपाची तीव्रता ५.२ रिश्टर स्केल मोजण्यात आली होती.

हे ही वाचा:

राज्यातील नराधमांना आळा घालायला ठाकरे सरकार अपयशी

आता हिंदू धर्माविषयी शिका आणि पदवी मिळवा

नुसती माणसेच नाही तर श्वानही सुखरूप परत आणले

ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने का झापले?

जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओ सायन्सेस’च्या म्हणण्यानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात होता. भूकंपाच्या तीव्र धक्क्यानंतरही इथे कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नव्हतं. भूगर्भीय हालचालींमुळे उत्तर भारतात गेल्या काही वर्षांपासून भूकंपाचा धोका वाढलेला दिसून येतोय.

हिमालय हा दोन टेक्टोनिक प्लेटच्या आपापसातील टकरींतून निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याठिकाणी भूगर्भीय हालाचाली सातत्याने होत असतात. एखाद्यावेळी मोठ्या भूगर्भीय हालचालीमुळे नुकसानकारक भूकंप देखील होऊ शकतो. काही वर्षांपूर्वी नेपाळला अशाच प्रकारच्या मोठ्या भूकंपाचा सामना करावा लागला होता.

Exit mobile version