जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवार, २० ऑगस्ट रोजी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी सकाळीचं भूकंपाचे धक्के जाणवल्याने जम्मू-काश्मीरमध्ये खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भूकंप इतका जोरदार होता की यामुळे लोकांची झोप उडाली आणि ते घाबरून उठले. सर्व घराच्या बाहेर पडले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली. जम्मू-काश्मीरमध्ये काही वेळाच्या अंतराने दोन वेळा भूकंप आला. पहिला भूकंप हा दुसऱ्या भूकंपाच्या तुलनेत अधिक जोरदार होता. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.९ इतकी होती. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला, पूंछ आणि श्रीनगरसह काश्मीर खोऱ्यात भूकंपाचे धक्के जाणवले.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदी २३ ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर
सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न आता पूर्ण करायचेय!
जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये चकमक, सीआरपीएफचा अधिकारी हुतात्मा !
लाडक्या बहिणींचे आशीर्वाद फळणार का?
दुसरीकडे पाकिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे. दरम्यान, आतापर्यंत भूकंपाच्या घटनेत कोणतीही जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही.