आसामला भूकंपाचा धक्का

आसामला भूकंपाचा धक्का

आज आसामला तीव्र भूकंपाचा धक्का बसला. आसामच्या गुवाहाटीसहीत पूर्वेकडच्या अनेक राज्यांत भूकंपाचे धक्के जाणवले. पूर्वेकडच्या बिहार, आसाम, पश्चिम बंगाल या राज्यांच्या विविध भागांत भूकंपाचे वेगवेगळ्या सौम्यतेचे धक्के जाणवले होते.

आसामला सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी लागोपाठ दोन झटके जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू आसाममधील सोनीतपूरमधील ढेकियाजुली येथे होता.भूकंपाचा धक्का बसल्यानंतर लोक आपापल्या घराबाहेर पडले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीप्रमाणे भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल इतकी होती. आसामच्या मुख्यमंत्री सोनभद्र सोनवाल हे सर्व जिल्ह्यांचा आढावा घेत असून, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. गुवाहाटीमध्ये भूकंपानंतर अनेक ठिकाणी वीज गायब झाली होती. भूकंपाच्या झटक्यानंतर आसामचे आरोग्य मंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनीही दोन फोटो शेअर केले आहेत.

हे ही वाचा:

नियम मोडणाऱ्या फेरीवाल्यांची वॉर्ड ऑफिसरला मारहाण

सेहवाग देतोय कोविड रुग्णांना मोफत जेवण

१० राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

ब्रेट लीकडून भारताला ४० लाखांची मदत

भूकंपाचा प्रभाव बिहार आणि उत्तर बंगालमध्येही जाणवला. दार्जिलिंगमध्येही लोक आपापल्या घरांतून बाहेर पडले. तसंच बिहारच्या अनेक जिल्ह्यांतही सकाळी ७.५५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. मुंगेर, कटिहार, किशनगंज, भागलपूर, पूर्णिया, खगडिया यांसहीत अनेक भागांत लोकांना भूकंपाचा धक्का सहज जाणवला.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीप्रमाणे भूकंपाचा पहिला धक्का ७ वाजून ५१ मिनिटांनी जाणवला. पहिल्या तीव्र झटक्यानंतर नंतर लागोपाठ दोन हादरे जाणवले. एक ७ वाजून ५५ मिनिटाला तर त्यानंतर थोड्या वेळाने दुसरा. भूकंपाच्या या धक्क्यांची तीव्रता पहिल्या धक्क्याच्या तुलनेत कमी होती. ७ वाजून ५५ बसलेला झटका ४.३ रिश्टर स्केल, तर दुसरा ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.

Exit mobile version