आसाम पुन्हा हादरले

आसाम पुन्हा हादरले

पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले

आसामला आज दुपारी पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. आज दुपारी एकच्या सुमारास पुन्हा एकदा ३.६ रिश्टरचा धक्का बसला आहे, ही माहिती नॅशनल सेंटर फॉर सेस्मॉलॉजीने दिली आहे. यावेळी देखील भूकंपाचे केंद्र सोनितपूर आहे.

एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार दुपारी १ वाजून ४ मिनिटांनी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के आसामला बसले. भूकंपाचे निश्चित केंद्र तेजपूरच्या पश्चिमेला ४६ किमीवर होते, तर केंद्र २७ किमी खोलीवर होते.

हे ही वाचा:

“भारताला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे”, प्रिन्स चार्ल्स

कोविडकाळात नागरिकांना सैन्याची साथ

रेड्डीला झालेली अटक हा राज्यातील प्रत्येकाचा विजय

‘अपोलो-११’चे वैमानिक मायकल कॉलिन्स यांचे निधन

नॅशनल सेंटर फॉर सेस्मॉलॉजीने याबाबत ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की,

आज दुपारी  १ वाजून ४ मिनिटांनी ३.६ रिश्टरचा भूकंप  २६.६१ अक्षांश आणि ९२.३३ रेखांश येथे झाला, खोली २७ किमी, स्थळ तेजपूरच्या पश्चिमेला ४६ किमी

आज दिवसभरात भूकंपाचे सहा धक्का बसले होते. दिवसभरात २.६, २.९, ४.६, २.७, २.३, २.७ रिश्टरचे भूकंपाचे झटके बसले.

काल (बुधवारी) सकाळी भूकंपाचा मोठा धक्का आसामला बसला होता. त्यानंतर सुमारे १० धक्के दिवसभरात बसले होते. त्यावेळी सकाळी ६.४ रिश्टरचा बसलेला सर्वात मोठा भूकंपाचा धक्का बसला होता.

एनसीएसच्या माहितीनुसार हा प्रदेश सर्वाधिक भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. या क्षेत्रात भारतीय प्लेट युरेशियन प्लेटच्या खाली सरकत असल्याने केव्हाही भूकंप होण्याची शक्यता असते.

Exit mobile version