जपानच्या अंतराळ संशोधकांना सापडला पृथ्वीसदृश्य ग्रह

‘द ऍस्ट्रॉनॉमिकल जर्नल’मध्ये संशोधन झाले प्रकाशित

जपानच्या दोन खगोलशास्त्रज्ञांना आपल्या सूर्यमालेत पृथ्वीसारखा दिसणारा ग्रह आढळला आहे. हा ग्रह अंतराळातील क्विपर पट्ट्यात आहे. प्लॅनेट नाइनपेक्षा पृथ्वीसारखा दिसणारा हा ग्रह खूप जवळ आहे, असे संशोधन ‘द ऍस्ट्रॉनॉमिकल जर्नल’मध्ये प्रकाशित झाले आहे.

अनेक वर्षांपासून, खगोलशास्त्र समुदायाने आपल्या सौरमालेतील नवव्या ग्रहाचा अंदाज वर्तवला असून, ज्याला सामान्यतः ‘प्लॅनेट नाईन’ असे म्हणतात. हा ग्रह क्विपर पट्ट्यात असल्याचे मानले जाते. मात्र जपानमधील संशोधकांच्या मते, प्लॅनेट नाइनपेक्षा जवळ दुसरा ग्रह असू शकतो, जो नेपच्यूनच्या कक्षेच्या पलीकडे असलेल्या क्विपर पट्ट्यामध्ये लपला आहे. हा अभ्यास ओसाका जपानमधील किंडई विद्यापीठाच्या पॅट्रीक सोफिया लाइकाव्का आणि टोकियोमधील जपानच्या राष्ट्रीय खगोलशास्त्रीय वेधशाळेच्या ताकाशी इटो यांनी केला आहे.

 

पृथ्वी आणि या ग्रहामधी अंतर हे पृथ्वी आणि सूर्यामधील अंतराच्या ५०० पट अधिक असले तरी ते प्लॅनेट नाइनपेक्षा जवळ आहे. तज्ज्ञांच्या मते, हा ग्रह पृथ्वीपेक्षा तिप्पट असू शकतो. मात्र येथील वातावरण खूप थंड असण्याची शक्यता आहे. क्विपर बेल्टमध्ये लाखो बर्फाळ वस्तू आहेत, त्या नेपच्यूनच्या पलीकडे स्थित असल्याने त्यांना ट्रान्स-नेपच्युनियन ऑब्जेक्ट्स असे म्हटले जाते.

हे ही वाचा:

दहीहंडीच्या दिवशी ढगांचे थर आणि वर्षोल्हास

‘भारत उत्पादनाचे नवीन केंद्र असेल’

‘भारत’मुळे I.N.D.I.A.ला फुटला घाम

मुंबईत भाजपाकडून ४०० ठिकाणी दहीहंडी उत्सव !

खगोलशास्त्रज्ञांच्या मते, हे ‘ऑब्जेक्ट्स’ सौर मंडळाच्या निर्मितीचे अवशेष आहेत. ते खडक, आकारहीन कार्बन आणि वाष्पशील बर्फ आहेत. ते पाणी आणि मिथेन यांच्या मिश्रणाने बनलेले आहेत. ‘ट्रान्स-नेप्च्युनियन ऑब्जेक्ट्स’ सौर मंडळामध्ये शोधून न सापडलेल्या ग्रहाचे अस्तित्व दर्शवू शकतात,” असे संशोधकांनी नमूद केले. ‘हे खडक आणि बर्फाचे सौर मंडळातील ग्रहनिर्मितीचे अवशेष आहेत,’ असेही त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या निकटच्या मोठ्या गुरुत्वाकर्षणाने या वस्तूंवर प्रभाव पडून त्यांना ‘विचित्र कक्षा’ मिळतात, असे मत खगोलशास्त्रज्ञांनी मांडले असून या क्विपर पट्ट्याच्या अधिक संशोधनाची गरज व्यक्त केली आहे.

Exit mobile version